सध्या बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांच्या चर्चा आहेत. काही चित्रपटांचे शूटिंग सुरू असून काही चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. या सगळ्यामध्ये सनी देओलचा ‘गदर २’चेही नाव सामील आहे. नुकतीच या चित्रपटातील सनी देओलची पहिली झलक समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये तो असा पराक्रम करताना दिसत आहे, जे पाहून चाहते पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले आहेत.

२००१ प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता जवळपास २१ वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच ‘गदर २’ची एक छोटीशी क्लिप समोर आली आहे. यात ‘गदर’ चित्रपटात सनी देओल ज्या प्रकारे हातपंप उखडताना दिसला होता. त्याचबरोबर आता आगामी चित्रपटात तो आणखी एक मोठा पराक्रम करताना दिसत आहे.

आणखी वाचा : Video: “टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही ‘श्रावणी’चं स्वागत केलं, पण…” ‘वेड’ला मिळणारं यश पाहून जिनिलीया देशमुखने केलेली पोस्ट चर्चेत

‘झी स्टुडिओ’च्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये अनेक चित्रपटांची झलक पाहायला मिळत आहे. त्यामध्ये एक सनी देओलची ‘गदर २’ चित्रपटातील क्लिपही दिसत आहे. या क्लिपमध्ये सनी देओलने बैलगाडीचे चाक डोक्यावर धरलेले दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत आहे. त्याने पगडी घातली आहे आणि तपकिरी रंगाचा पोशाख परिधान केला आहे.

हेही वाचा : दोन दशकांनंतर तारासिंह आणि सकिना येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘गदर २’च्या शूटिंगला सुरुवात

२००१ च्या ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटात सनीने तारा सिंग ही भूमिका साकारली होती. त्यावेळी हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. आता याच्या दुसऱ्या भागातही तो याच भूमिकेत दिसणार आहे. या दुसऱ्या भागाबद्दलही प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर #Gadar सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहे.