बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना मुंबईतील एक कॉन्सर्टदरम्यान धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यानंतर आता सोनू निगमचा मुंबई विमानतळावरील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना सोमवारी (२० फेब्रुवारी) चेंबूर येथील एका संगीत कार्यक्रमात (कॉन्सर्ट) धक्काबुक्की झाली. त्यानंतर आता सोनू निगम पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला. यावेळी तो त्याच्या वडिलांबरोबर मुंबई विमानतळावर दिसला. या व्हिडीओत तो एका गाडीतून विमानतळावर उतरताना दिसत आहे. त्याच्या बरोबर त्याचे वडीलही दिसत आहे. यावेळी काही पापाराझींनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली.
आणखी वाचा : Video : गाडीतून उतरली, रेखा यांच्या तोंडाजवळ गेली अन्… आलिया भट्टचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

यावेळी सोनू निगमने “मी ठिक आहे, मला बर वाटतंय”, असं सांगितलं. त्यावेळी एकाने ‘तुमची काळजी घ्या सर’, असे सोनू निगमला सांगितले. त्यावर सोनूने परत एकदा “मी ठिक आहे, काळजी करु नका”, असे म्हटले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॉन्सर्ट दरम्यान नेमकं काय घडलं?
सोमवारी(२० फेब्रुवारी) चेंबूर येथे एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सोनू निगमही उपस्थित होता. कार्यक्रम झाल्यानंतर सोनू निगम व त्याचे काही सहकारी मंचावरुन खाली उतरत असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान, या घटनेत सोनू निगम व त्याचा एक सहकारी जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सोनू निगमने चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू निगमला धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीचं नाव स्वप्नील फेटरपेकर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer sonu nigam spotted with father at the mumbai airport after attacked in chembur see video nrp