scorecardresearch

Video : गाडीतून उतरली, रेखा यांच्या तोंडाजवळ गेली अन्… आलिया भट्टचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Video : “लिप किस…” आलिया भट्ट आणि रेखा यांचा तो व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

rekha alia bhatt

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून आलिया ही तिची लेक राहामुळे चर्चेत आहे. नुकतंच आलियाने दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी आलिया भट्ट आणि अभिनेत्री रेखा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे आलियासह रेखालाही ट्रोल केले जात आहे.

सोमवारी २० फेब्रुवारी रोजी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान आलिया भट्ट आणि रेखा यांच्या लूकची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली.

या सोहळ्यादरम्यान आलिया भट्टने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्याबरोबरच तिने केस मोकळे ठेवले असून कानात डायमंडचे एअररिंग्स परिधान केले होते. तर रेखा यांनी ऑफव्हाईट रंग असलेली आणि गोल्डन बॉर्डर असणारी साडी परिधान केली होती. याबरोबर त्यांनी लाल रंगाची लिपस्टिक आणि त्याला साजेसा मेकअप केला होता. याचा एक व्हिडीओ आणि फोटो समोर आला आहे.

या व्हिडीओत आलिया ही गाडीतून खाली उतरताना दिसत आहे. त्यावेळी ती रेखा यांना बघून थांबते आणि त्यानंतरत्या दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ जाऊन घट्ट मिठ्ठी मारताना दिसत आहे. त्यावेळी त्या दोघीही गप्पा मारतानाही दिसत आहे. त्यानंतर त्या दोघींनी हातात हात घालून या सोहळ्यात एंट्री घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

पण या व्हिडीओमुळे रेखा आणि आलिया ट्रोल झाले आहेत. या व्हिडीओत आलिया आणि रेखा हे एकमेकांच्या तोंडासमोर आल्याने अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. हा व्हिडीओ पाहून एक नेटकरी म्हणाला, “असं वाटलं की लिप किस करणार आहेत.” तर एकाने म्हटले की “आलिया किती चिपकते आहे.” तर एकाने “ना सिंदूर लावलं आहे, ना मंगळसूत्र. त्यावर पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. असं मी केलं असते तर माझ्या सासूने मला टोमणे मारले असते”, अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 09:51 IST