Salman Khan Aishwarya Rai Breakup Reason: बॉलीवूडमधील काही जोड्या नेहमीच चर्चेत राहतात. जरी हे कलाकार वेगळे झाले तरी वर्षानुवर्षे त्यांच्या नात्यांची चर्चा होताना दिसते. रेखा व अमिताभ बच्चन, मुमताज व शम्मी कपूर तसेच ऐश्वर्या व सलमान खान अशा अनेक कलाकारांबद्दल आजही बोलले जाते.

ऐश्वर्या राय व सलमान खान दोघेही बॉलीवूडमधील यशस्वी कलाकार आहेत. एक काळ असा होता की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र, कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले. सलमान खान किंवा ऐश्वर्या राय यांनी त्याबाबत कधीच वक्तव्य केलेले नाही. मात्र, सलमान खानचा भाऊ सोहेल खानने सलमान व ऐश्वर्याच्या ब्रेकअपबद्दल वक्तव्य केले होते.

ती कधीही त्याबाबत उघडपणे…

सोहेल खानने मीडियाला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सलमान ऐश्वर्याच्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. ऐश्वर्या राय आमच्या कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणे सतत आमच्या घरी येत असे. खान कुटुंबाकडून तिला नेहमीच खूप प्रेम मिळाले आहे. मात्र, ऐश्वर्या रायने कधीही सलमान खानबरोबरच्या नात्याचा उल्लेख सार्वजनिकरीत्या केलेला नाही. तिने ते नाते गुपित ठेवले. ती कधीही त्याबाबत उघडपणे बोलली नाही. त्यामुळे सलमान खानला असुरक्षित वाटत होते. तिच्या आयुष्यात त्याला किती महत्त्व आहे, हे त्याला जाणून घ्यायचे होते.

सोहेल खानने असेही म्हटले होते की, जेव्हा ती विवेक ओबेरायबरोबर नात्यात होती. त्यावेळीदेखील ती सलमान खानच्या संपर्कात होती. त्यामुळे सलमान दु:खात बुडाला होता.

संगीतकार इस्माइल दरबार यांनी एकदा खुलासा केला होता की, एकदा ‘तडप तडप’ हे गाणे लागले होते. तेव्हा सलमान खानला अतिशय दु:ख झाले होते. सलमान खानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने अभिनेत्यावर काही आरोप केले होते. सलमान खानने शिवीगाळ, शारीरिक, मानसिक छळ केल्याचे तिने म्हटले होते. तसेच सलमान खानने विश्वासघात केल्याचे वक्तव्य ऐश्वर्याने केले होते. ऐश्वर्याच्या आरोपांवर सलमान खानने कधीही वक्तव्य केले नाही.

दरम्यान, ऐश्वर्या रायने २००७ ला बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनबरोबर लग्नगाठ बांधली. २०११ ला त्यांना मुलगी झाली. तिचे नाव आराध्या, असे आहे. ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत होती.

सलमान खानबद्दल बोलायचे, तर अभिनेता अद्याप अविवाहित आहे. तो नुकताच ‘सिकंदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मोठी कमाई करण्यात अयशस्वी ठरला. या चित्रपटात त्याच्याबरोबर रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसली होती. आगामी काळात तो कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.