बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा यांनी २४ स्प्टेंबरला लग्नगाठ बांधली. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये या लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक नेते उपस्थिती लावली होती. परिणीती आणि राघव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- गरोदरपणाच्या चर्चांवर अनुष्का शर्माने सोडलं मौन? अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने चर्चांना उधाण

लग्नातला परिणीतीचा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आपल्या लग्नात परिणीतीने एकदम साधा लूक केला होता. तिच्या या साधेपणाचं सगळीकडे कौतुकही झालं होतं. तर काहींनी या लूकवरुन अभिनेत्रीला ट्रोलही केलं होतं मात्र, परिणीतीने आपल्या लग्नात एवढा साधा लूक का केला? यामागच कारण समोर आलं आहे. परिणीतीची स्टाईलिस्ट निधी अग्रवाल आणि श्रद्धा लखानीने यामागच कारण सांगितलं आहे.

हेही वाचा- तहान, भूक विसरून ‘मन्नत’ बाहेर पाहिली शाहरुखची वाट; ३२ दिवसांनी किंग खानने दिलं चाहत्याला सरप्राईज

निधी म्हणाली, “परिणीतीला तिच्या लग्नात एक साधा लूक हवा होता जेणेकरून तिला स्वतःच्या लग्नाचा आनंद घेता येईल. तिने आम्हाला सांगितले की मला माझ्या लग्नाचा आनंद घ्यायचा आहे. मला अभिनेत्रीसारखे वागवू नकोस. माझी ओढणी धरून माझ्या मागे कोणी येऊ नये असे मला वाटते. मला लग्नाच्या दिवशी खूप आरामात राहायचे आहे. मी माझ्या कोणत्याही लग्नाच्या कार्यक्रमात हील्स घालणार नाही, मी फक्त फ्लॅट चप्पल घालेन. जमल्यास मला स्नीकर्स द्या.”

श्रद्धा म्हणाली, “मेहेंदीतही परिणीतीने साधा लूक सांगितला होता, परिणीती म्हणाली होती की मी वधूच्या मैत्रिणीसारखी दिसली तरी काही फरक पडत नाही.” परिणीतीचा लेहेंगा सोनेरी रंगाचा असल्याचाही श्रद्धाने खुलासा केला. परिणीतीने तिच्या लग्नात प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.

हेही वाचा- “भर पार्टीत शाहरुख खानने माझा हात धरला अन्…” गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली…

लग्नानंतर परिणीती आणि राघव ३ ठिकाणी रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मुंबई, दिल्ली आणि चंदीगढमध्ये. बॉलीवूडमधील कलाकारांसाठी मुंबईत, राजकीय नेत्यांसाठी दिल्लीत आणि नातेवाईकांसाठ चंदीगढमध्ये परिणीती आणि राघव रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता दिल्ली आणि चंदीगढमधील रिसेप्शनचा विचार तुर्तास रद्द करण्यात आला असून फक्त मुंबईतच रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. ४ ऑक्टोबरला मुंबईत परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचं रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why parineeti chopra choose simple look as bride actress stylist reveal the real reason dpj