बॉलीवूडमध्ये पदार्पण करणं ‘स्टारकिड्स’ साठी सोपं असतं. पण आपल्या पालकांइतकं यश मिळवणं किंवा आपल्या प्रतिभेच्या जोरावर इंडस्ट्रीत टिकून राहणं व स्वतःचं स्थान निर्माण करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. असाच एक अभिनेता आहे, ज्याचे वडील व भाऊ बॉलीवूडमधील आघाडीचे निर्माते आहेत. पण तो १३ वर्षांत एकही हिट चित्रपट देऊ शकला नाही. त्याने शाहरुख खानबरोबर पदार्पण केलं होतं. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले, पण ते मल्टिस्टारर होते. त्याची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटांची संख्या फारच कमी आहे. आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय, त्याचं नाव उदय चोप्रा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदय चोप्रा हा दिग्गज चित्रपट निर्माते यश चोप्रा व पामेला चोप्रा यांचा धाकटा मुलगा आहे. उदयने आपल्या वडिलांचे प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्सने निर्मिती केलेल्या सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने २००० मध्ये ‘मोहब्बते’ या चित्रपटातून पदार्पण केलं. यात जिमी शेरगिल, शाहरुख खान, शमिता शेट्टी, ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन अशी तगडी स्टारकास्ट होती. अभिनयात येण्यापूर्वी उदयने ‘लम्हे’, ‘डर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल तो पागल है’ आणि इतर चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. यासंदर्भात डीएनएने वृत्त दिलं आहे.

बॉलीवूडचा २०२३ मधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, देशभरात कमावले फक्त १० हजार रुपये; तुम्ही पाहिलाय का?

उदयने ‘मुझसे दोस्ती करोगी’, ‘मेरे यार की शादी है’, ‘सुपारी’, ‘चारा: ए जॉइंट ऑपरेशन’, ‘प्यार इम्पॉसिबल’, ‘धूम’ आणि ‘धूम २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं. २०१३ मध्ये आमिर खान, अभिषेक बच्चन आणि कतरिना कैफ स्टारर ‘धूम ३’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. नंतर त्याने अभिनय सोडला. त्याचे हिट झालेले बहुतांशी चित्रपट हे मल्टी-स्टारर होते. फक्त त्याची मुख्य भूमिका असलेला एकही चित्रपट हिट झाला नाही. नंतर उदय चोप्रा निर्माता बनला आणि त्याने ‘द लाँगेस्ट वीक’, ‘ग्रेस ऑफ मोनॅको’ सारखे चित्रपट बनवले.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या

उदय चोप्राने २०१२ मध्ये योमिक्स लाँच केले. त्याअंतर्गत त्याने ‘धूम’, ‘हम तुम’, ‘एक था टायगर’ आणि ‘दया प्रोचू’ या चार कॉमिक मालिका तयार केल्या. सध्या तो वायआरएफ एंटरटेनमेंटचा सीईओ आहे, ही हॉलिवूड आधारित निर्मिती कंपनी आहे. उदयच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ९००० कोटी रुपये आहे. त्यांचे तीन प्रॉडक्शन हाऊस आहेत. उदय चोप्राचा भाऊ आदित्य चोप्रा हा एक लोकप्रिय चित्रपट निर्माता आहे, रानी मुखर्जी त्याची वहिनी आहे. उदयची एकूण संपत्ती ५० कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yash chopra son uday chopra acting career left movies know his net worth hrc