अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी आणि सारा ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “‘बजरंगी भाईजान’च्या क्लायमॅक्समध्ये…” एस. एस. राजामौलींनी दिला होता ‘तो’ सल्ला, म्हणाले, “शेवटी सलमान…”

विकी कौशलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवारी ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाचे “तू है तो मुझे फिर और क्या चाहिए…” हे पहिले रोमॅंटिक गाणे रिलीज करण्यात आले. “फिर और क्या चाहिए…” हे गाणे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विकी कौशल आणि साराने ऑनस्क्रीन जोडीप्रमाणे ऑफस्क्रीनसुद्धा या गाण्यावर एक रोमॅंटिक व्हिडीओ बनवला आहे.

विकी कौशल आणि साराने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केल्यावर काही वेळातच याला लाखो लाइक्स आले आहेत. दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहून काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी “विकी सांभाळून राहा, कतरिनासुद्धा तुझा व्हिडीओ बघत आहे,” “कतरिना तुला घरी गेल्यावर सोडणार नाही,” तर काहींनी “कतरिनाला टॅग करत बघ तुझा नवरा काय करतोय,” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : “चिंता, काळजी आणि ट्रोल…” बाईक राईडच्या फोटोवर अमिताभ बच्चन यांचे स्पष्टीकरण

राकेश बेदी, शारिब हाश्मी, नीरज सूद यांसारखे अनेक दिग्गज कलाकार ‘जरा हटके जरा बचके’या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘जरा हटके जरा बचके’ची निर्मिती मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज यांनी केली असून चित्रपट, २ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर विकी-साराच्या चाहत्यांनी दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zara hatke zara bachke vicky kaushal and sara ali khan recreate phir aur kya chahiye song watch video sva 00