महानायक अमिताभ बच्चन यांच्या बाईक राईडचा फोटो सोमवारी प्रचंड व्हायरल झाला होता. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागितली होती. यासंदर्भात त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करीत संबंधित व्यक्तीचे आभार मानले होते. बाईकने प्रवास करताना अमिताभ बच्चन यांनी हेल्मेट घातले नसल्याने त्यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. यावर आता ‘बिग बीं’नी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा : कान्सच्या रेड कार्पेटवर नवरीसारखी सजली ‘सारा’, नेटकरी कौतुक करीत म्हणाले, “भारतीय पोशाखापेक्षा…”

thane lok sabha marathi news, rajan vichare latest marathi news
“राजन विचारे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन केल्याने एम.के. मढवी यांना अटक”, सुषमा अंधारे यांची टीका
Ravi Kishan DNA test,
रवी किशन यांच्या डीएनए चाचणीची मागणी न्यायालयाने फेटाळली
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा

बाईक राईड करताना हेल्मेट का नव्हते घातले याबाबत अमिताभ बच्चन ब्लॉगवर प्रतिक्रिया देत म्हणाले, “माझ्या बाईक राईडचे फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक घडामोडी घडत आहेत. बलार्ड स्ट्रीटवर चित्रीकरण करण्यासाठी आम्ही रविवारचा दिवस पाहून रितसर परवानगी घेतली होती. शूटिंगच्या परिसरात केवळ ३० ते ४० लोक होते. जो फोटो मी पोस्ट केला होता त्यात मी एका क्रू मेंबरच्या बाईकवर बसलो होतो आणि कपडे सुद्धा शूटिंगदरम्यानचे आहेत. या बाईकने मी कुठेही प्रवास न करता केवळ प्रवासासाठी तुमचा वेळ बाईकमुळे कसा वाचू शकतो याबाबत माहिती दिली आहे.”

हेही वाचा : “पौर्णिमा गायकवाडची भूमिका साकारताना…” प्रिया बापटने सांगितला ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये काम करण्याचा अनुभव

अमिताभ बच्चन पुढे सांगतात, “समजा एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचायचे असेल, तर मी प्रवास करताना हेल्मेट घालून वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करुन बाईकने प्रवास करेन. वेळ वाचवण्यासाठी असा प्रवास करणारा मी एकटा नसून याआधी अक्षय कुमारने सुद्धा सेटवर वेळेत पोहोचण्यासाठी बाईकची मदत घेतली होती.”

आपल्या ब्लॉगच्या शेवटी ‘बिग बी’ म्हणाले, “माझी एवढी चिंता, काळजी आणि मला ट्रोल केल्याबद्दल आभार…मी वाहतुकीचे कोणतेही नियम मोडले नाहीत. गैरसमज करुन घेऊ नका मी तसे काहीही केले नाही. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप प्रेम…” दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासह ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात झळकणार आहेत.