"कुशल बद्रिकेने मला जबरदस्ती…" श्रेया बुगडेची 'ती' पोस्ट चर्चेत | Chala Hawa Yeu Dya Shreya Bugde share video talk about Kushal Badrike forcefully do this nrp 97 | Loksatta

“कुशल बद्रिकेने मला जबरदस्ती…” श्रेया बुगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Bugde, Kushal Badrike
तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे

‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच श्रेयाने सोशल मीडियावर अभिनेता कुशल बद्रिकेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी झी मराठी अवॉर्ड्स २०२२ ची नॉमिनेशन पार्टी मुंबईत पार पडली. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री श्रेया बुगडेनेही यावेळी वेस्टर्न ड्रेसमध्ये हजेरी लावली. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती या लूकमध्ये फार सुंदर दिसत असून अनेकांनी तिच्या या लूकचे कौतुक केले. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर या लूकमधील फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

श्रेयाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन देताना ती म्हणाली, “कुशल बद्रिकेने माझ्या फोनमधून माझे फोटो जबरदस्तीने घेऊन, त्याचा 1 व्हिडीओ बनवला आहे आणि मला तो पोस्ट करण्याची जबरदस्ती केली आहे, म्हणून मी हा व्हिडीओ पोस्ट करत आहे. पण तुम्हाला लाइक्स आणि कमेंट्स करण्याची जबरदस्ती तो करू शकत नाही. म्हणुन मी देवाचे आभार मानते.”

आणखी वाचा : “श्रेया बुगडे आम्हाला अशी उघड्यावर पाडेल असं वाटलं नव्हतं…”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

श्रेया बुगडने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टखाली अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावर कुशल बद्रिकेनेही कमेंट करत प्रतिक्रिया दिली. “वा.. वा…. काय जबरदस्त व्हिडीओ केलाय मी, शाब्बास रे माझा मला”, असे त्याने म्हटले आहे.

दरम्यान श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके हे दोघेही कायमच एकमेकांची मजा-मस्ती करत असतात. फक्त ऑनस्क्रीन नव्हे तर ऑफस्क्रीनही त्या दोघांची धमाल मस्ती पाहायला मिळते. त्या दोघांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. ते दोघेही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या खऱ्या आयुष्यासह सेटवरील गंमती-जंमतीचे फोटो शेअर करताना दिसतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-09-2022 at 13:27 IST
Next Story
रिचा चड्ढाच्या हातावर सजली अली फझलच्या नावाची हटके मेहंदी, फोटो व्हायरल