‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल बद्रिके. विनोदाचे बादशाह, हुकमी एक्के अशी त्याची ओळख आहे. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. नुकतंच कुशल बद्रिकेने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने अभिनेत्री श्रेया बुगडेविषयी सांगितले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

कुशल बद्रिकेने काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात हजेरी लावण्यापूर्वी कुशलने इन्स्टाग्रामवर त्याचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला होता. त्यात श्रेया बुगडेने त्याला ‘तुला खेकडे खायला प्रचंड आवडतात’, असं विचारले. त्यावर कुशल म्हणतो, “मला खेकडे कसे खातात हे माहिती नव्हते. एकदा मी खेकडा खायला घेतला आणि दाताने त्याची नांगी मोडली, त्यावेळी माझा दातही तुटला होता”, असा किस्सा त्याने सांगितला.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

कुशल बद्रिकेची पोस्ट

हा व्हिडीओ पोस्ट करताना कुशल म्हणाला, “माझ्या बायकोला माहीत नाहीत, तेवढे माझे सिक्रेट्स श्रेया बुगडेला माहित आहेत. त्यामुळे ती अँकर असलेल्या शोवर जाताना काळजात धडधडत होतंच. पण शूटिंगच्या दरम्यान लक्षात आलं की माझं ते धडधडण उगाच नव्हतंच. अँकर म्हणून श्रेया किचन कल्लाकारमध्ये धुमाकूळ घालते, पण प्रत्यक्ष आयुष्यात तिचे किचनमधले प्रताप आम्ही (हवा येऊ द्या ची टीम) आवडीने चघळतो. पण सूड म्हणून ती एक दिवस आम्हाला अशी उघड्यावर पाडेल असं मात्र वाटलं नव्हतं.”

“विशेष बाब- या कार्यक्रमासाठी माझी खास तयारी, माझी बायको सुनयना आणि भाऊ कदमची बायको ममता वहिनी यांनी करून घेतली. त्यांनी शिकवलेल्या पदार्थांपैकी एखादी डिश मला बनवायला दिली असती तर कदाचित माझी अब्रू वाचली असती असो…” असे कुशलने म्हटले.

“आई तुझ्यापर्यंत ते पोहोचतं का ग?”, ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ मालिकेतील अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान कुशलने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टखाली अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. अनेकांनी त्याची ही पोस्ट पाहून हसणारे इमोजी शेअर केले आहेत. तर काहींनी हा भाग छान असणार, आम्हाला बघायला आवडेल, अशी कमेंट केली आहे.