Latest Bollywood, Hollywood & Tollywood Updates : अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारचा आगामी पृथ्वीराज हा चित्रपट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाहणार आहे. तर दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्याला ग्रॅमी अवॉर्ड विजेता अभिनेता विंसेंट डी पॉल यांच्या हस्ते देण्यात आला.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तसेच ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असलेल्या फोटोंची नेहमीच चर्चा रंगते. तिने नुकतंच साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे. प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
अभिनेता पुष्कर जोग याची आई आणि जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेखा जोग यांनी शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा केल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी सुरेखा जोग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिग्दर्शक-अभिनेता करण जोहरचा आज ५०वा वाढदिवस. करणच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. पण त्याने मागे कधीच वळून पाहिलं नाही. त्याचबरोबरीने वयाची पन्नाशी गाठली तरी त्याने आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष दिलं आणि अजूनही तो फिटनेसकडे आवर्जून लक्ष देतो. त्याचं फिटनेस सीक्रेट नेमकं काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. अक्षय कुमारचा आगामी पृथ्वीराज हा चित्रपट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाहणार आहेत.
अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक जण ‘वाय’ अक्षराचे पोस्टर शेअर करत आहेत. नुकतंच भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनीही सोशल मीडियावर ‘वाय’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याद्वारे त्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे.
अभिनेत्री कंगना रणौतचं नशिब तिला सध्या साथ देत नाही असंच वाटतंय. तिचे अलिकडे प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्सऑफिसवर अपयशी ठरत आहेत. मात्र हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला. चित्रपटांमुळे सतत चर्चेत राहिलेल्या या अभिनेत्रीने मध्यंतरी करोडो रुपयांची कार देखील खरेदी केली. पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळंच घडलं.
‘रानबाजार’ वेबसीरिजचे ३ भाग प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. या तीनही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. वेबसीरिजला मिळत असलेला प्रतिसाद पाहून ‘रानबाजार’चे पुढील भाग लवकरच प्रदर्शित होणार आहेत. अगदी कमी वेळात सीरिजला अधिक प्रतिसाद मिळाल्याने ‘रानबाजार’ची संपूर्म टीमदेखील भारावून गेली आहे.