Entertainment Breaking News Today 1 June 2025 : १ मे रोजी ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ असे दोन मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ हे सिनेमे प्रदर्शित होऊन आता १ महिना उलटला आहे. त्यामुळे गेल्या ३१ दिवसांत या सिनेमांनी किती कमाई केली जाणून घेऊयात…
सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुलकंद’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३१ दिवसांत ७.२९ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर, ‘आता थांबायचं नाय’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गेल्या महिन्याभरात ६.७७ कोटींची कमाई केली आहे.
Entertainment News Updates 1st June 2025
“माझ्या आईचं नवं दुकान…”, सिद्धार्थ चांदेकरची आई झाली बिझनेसवुमन! अभिनेत्याची खास पोस्ट, सर्वत्र होतंय कौतुक…
Miss World 2025 : १६ व्या वर्षी शरीरात कर्करोगाची गाठ ते विश्वसुंदरी…; यंदा कोणी जिंकला ‘मिस वर्ल्ड’चा खिताब? जाणून घ्या…
अखेर प्रतीक्षा संपली! CID 2 मध्ये शिवाजी साटम यांची एन्ट्री, पण असणार ‘हा’ ट्विस्ट, जाणून घ्या…
सूरज चव्हाणचा झाला साखरपुडा? चाहत्यांना दिला ‘गुलीगत धोका’! ‘तो’ Video पाहून जान्हवी किल्लेकर म्हणाली…
“बुरखा घालून परीक्षा दिली”, किशोरी शहाणेंनी सांगितला किस्सा, म्हणाल्या, “समवयीन मुलं सतत बघायचे आणि…”
“मी दहशतवादाचा बळी”, अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले, “मुंबईत २६/११ घडले तेव्हा…”
‘हिरामंडी’ फेम अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दोन वर्षांनी दिली गुडन्यूज, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न! ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा Video केला शेअर, पत्नी काय काम करते? पाहा…
एका आर्टिस्टचं घर…; मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी! पत्नी अन् लेकीसह नव्या घरात गृहप्रवेश, पाहा फोटो…
Gulkand Marathi Movie Box Office Collection : सई ताम्हणकरच्या ‘गुलकंद’ चित्रपटाने ३१ दिवसांत जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
Gulkand Marathi Movie Box Office Collection : सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुलकंद’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३१ दिवसांत ७.२९ कोटींचा गल्ला जमावला आहे. ही कमाई अलीकडच्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांच्या तुलनेत फारच चांगली आहे.
Ata Thambaycha Naay Box Office Collection : ‘आता थांबायचं नाय’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एका महिन्यात कमावले…
सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पर्ण पेठे, आशुतोष गोवारीकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘आता थांबायचं नाय’ सिनेमा यंदा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
‘आता थांबायचं नाय’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गेल्या ३१ दिवसांत ६.७७ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय सिनेविश्वातील अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटाचं आणि दिग्दर्शक शिवराज वायचळ याचंही कौतुक केलं आहे.
मराठीसह बॉलीवूडमध्ये मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? सर्वत्र कौतुक होणाऱ्या सिद्धार्थ जाधव अन् भरत जाधव यांच्या ‘आता थांबायचं नाय’ सिनेमाने ३१ दिवसांत किती कोटी कमावले जाणून घ्या…