कान्समधील दीपिकाचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘पद्मावत’मधला खिलजी, म्हणाले…

दीपिकाचे कान्स फेस्टिव्हलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

deepika padukone, ranveer singh,
दीपिकाचे कान्स फेस्टिव्हलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मुळे चर्चेत आहे. दीपिका या फेस्टिव्हलच्या ज्युरी सदस्यांच्या टीममध्ये सहभागी आहे. सोशल मीडियावर सध्या दीपिकाचे या फेस्टिव्हलमधील लुक व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात तिच्या साडी पासून ते गाऊन पर्यंत चर्चा ही सर्वत्र सुरु आहे, पण या सगळ्यात तिच्या एका गाऊनची आणि तिच्या लूकची तुलना ही पती रणवीर सिंगच्या ‘खिलजी’ या ‘पद्मावत’ चित्रपटातील भूमिकेशी होत आहे.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत Louis Vuitton या ब्रॅंडचा एक गाऊन परिधान केला आहे. तिचा हा लूक काही नेटकऱ्यांना प्रचंड आवडला तर काहींनी त्याची तुलना ही रणवीरच्या खिलजी या भूमिकेशी होत आहे.

आणखी वाचा : “शूटिंग दरम्यान अनोळखी व्यक्तिने २१ लाख रुपये देऊ केले तर…”, प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘शहामृग दिसत आहेस.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ड्रेस कमी हत्तीचे कान दिसत आहेत.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘रणवीरच्या खिलजी या लूकने प्रेरित असल्याचे दिसत आहे.’ खिलजीशी प्रेरित असल्याच्या अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा : अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांचा नवीन घरातील गृह प्रवेशाचे फोटो पाहिलेत का?

आणखी वाचा : “…म्हणून करण जोहरला बॅन करा”, ट्विंकल खन्नाचा व्हिडीओ चर्चेत

दरम्यान दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात तिच्याकडे बरेच प्रोजेक्ट आहेत. लवकरच ती अभिनेता शाहरुख खान सोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. तसेच हृतिक रोशन सोबत ‘फायटर’मधेही तिची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inspired by khilji fans on deepika padukone s dramatic gown with feather sleeves at cannes dcp

Next Story
VIDEO : मध्यरात्री भररस्त्यातच उभं राहून जेवत होता कार्तिक आर्यन, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी