बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जान्हवी चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोत जान्हवी सोबत एक ‘मिस्ट्री मॅन’ आहे. हा मिस्ट्री मॅन कोण आहे? असा प्रश्न जान्हवीच्या चाहत्यांना पडला आहे.

आणखी वाचा : सलमानने नकारलेल्या ‘या’ चित्रपटांमुळे शाहरुख झाला रातोरात स्टार, जाणून घ्या चित्रपटांविषयी

हे फोटो जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. फोटोत जान्हवीने बिकिनी परिधान केली आहे. एका फोटोमध्ये जान्हवी आहे. जान्हवी समुद्राच्या किनाऱ्यावर असून ती पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत जान्हवी एका ‘मिस्ट्री मॅन’ सोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करत “त्या प्रत्येक धुसर सुर्यास्ताचं सौदर्य क्षणभंगुर असतं”, अशा आशयाचे कॅप्शन जान्हवीने दिले आहे.

तर जान्हवीच्या चाहत्यांसमोर असलेला प्रश्न म्हणजे हा ‘मिस्ट्री मॅन’ कोण आहे? या ‘मिस्ट्री मॅन’चे नाव ओरहान अवत्रामनि असे आहे. ओरहान हा बॉलिवूडमधील न्यू जनरेशच्या अनेक कलाकारांचा बेस्ट फ्रेन्ड आहे. ओरहान हा जान्हवी कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान, अनन्या पांडे, शनाया कपूर यांचा खूप चांगला मित्र आहे. या सगळ्यां सोबत ओरहानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ओरहान हा मुंबईतच राहतो. तो कोलंबिया विद्यापीठात साराचा क्लासमेट होता. ओराहन अॅनिमेशन क्षेत्रात करिअर करण्याचे प्रशिक्षण घेत आहे.

आणखी वाचा : Indian Idol 12: ‘प्रत्येकवेळी ड्रामा करणं बंद करा’, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमीया झाले ट्रोल

दरम्यान, जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. ‘रुही’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट असून दिनेश विजय यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या आधी त्यांनी ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाची निर्मिती केली होती.