अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान आणि करीना कपूर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. येत्या काही दिवसात अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच करीनाचा भाऊ आणि अभिनेता रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. यावर करीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेशी बोलताना करीनाने ‘शमशेरा’च्या अपयशाबद्दल तिचं मत मांडल. यावेळी ती म्हणाली, “मी तो चित्रपट पाहिला नाही त्यामुळे त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने विचार करतो. काही जण चित्रपटाशी, कथेशी जोडले जातात, तर काहींना ती कथा तितकी आवडत नाही. प्रत्येकाचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे मी यावर भाष्य करण चुकीचं ठरेल”

आणखी वाचा – ‘शमशेरा’च्या अपयशावर दिग्दर्शक करण मल्होत्रा अखेर बोलला, “मला तिरस्कार पचवणं…”

‘शमशेरा’ चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूरने चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले होते. ‘संजू’ चित्रपटानंतर रणबीरला मोठ्या पडद्यावर दुहेरी भुमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. परंतु या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना फारसे आवडले नाही आणि त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.

आणखी वाचा – आमिर खानची ‘ही’ सवय करीनाला होत नाही सहन, ‘कॉफी विथ करण ७’मध्ये केला खुलासा

करीना कपूर आणि आमिर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. त्यांच दिवशी अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांचा ‘रक्षाबंधन’ देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक यातील कोणत्या चित्रपटाला पसंती देतात, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor on shamshera movie failure