kartik aryan indirectly reacts on karan johar chat show koffee with karan 7 | "मी खूप लोकप्रिय..." नाव न घेताच कार्तिक आर्यननं मारला करण जोहरला टोमणा | Loksatta

“मी खूप लोकप्रिय…” नाव न घेताच कार्तिक आर्यननं मारला करण जोहरला टोमणा

कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे.

“मी खूप लोकप्रिय…” नाव न घेताच कार्तिक आर्यननं मारला करण जोहरला टोमणा
कार्तिकने करणचं नाव न घेताच त्याला टोमणा मारला आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैय्या २’ बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. एककीडे बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरताना दिसत असताना कार्तिकचा चित्रपट मात्र यशस्वी ठरला. सध्या कार्तिक आर्यन त्याच्या आगामी चित्रपटांच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. अशातच आता त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत करण जोहरच्या एका व्यक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे कार्तिकने करणचं नाव न घेताच त्याला टोमणा मारला आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिक आर्यनने, “मी तर रॅपिड फायर राउंड असणाऱ्या शोमध्ये खूपच लोकप्रिय आहे.” असं वक्तव्य केलं. अर्थात कार्तिकने कोणाचं नाव घेतलं नाही. मात्र त्याच्या या वक्तव्यावरून तो करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोबद्दल बोलत असल्याचा अंदाज लावला जात आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार कार्तिक आर्यननं करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण ७’च्या त्या एपिसोडबद्दल बोलत होता. ज्यात रॅपिड फायर राउंडमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी कार्तिकचं नाव घेतलं होतं.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या ७ व्या सीझनमध्ये कार्तिक आर्यनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. पहिल्या ३ एपिसोडमध्येच अनेकदा करणने कार्तिक आर्यनचं नाव घेतलं आहे. कार्तिक आणि करणमध्ये ‘दोस्ताना २’ चित्रपटामुळे नाराजी आहे. करणच्या शोमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघींनी धम्माल केला होती. तर तिसऱ्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आणि सामंथा रुथ प्रभू यांनी हजेरी लावली होती.

आणखी वाचा- Video : कार्तिक- करण यांच्यात पुन्हा ‘दोस्ताना’, मतभेद विसरून केली धम्माल मस्ती

दरम्यान कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो सध्या ‘शहजादा’ या त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. रोहित धवन यांचं दिग्दर्शक असलेला हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात तो अलाया एफसोबत दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे शशांक घोषचा ‘फ्रेडी’ तसेच ‘सत्यनारायण की कथा’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ हे चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“…अन् त्याक्षणी मला पहिल्यांदा तिची किंमत कळली”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

संबंधित बातम्या

“आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
हॉलिवूडमधील महागडा घटस्फोट! अभिनेत्री किम कार्दशियनला कान्ये वेस्ट महिन्याला देणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
“आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू