Katrina Kaif First Pic After Pregnancy Announcement : कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलीवूडमधलं एक सुपरहिट जोडपं आहे. दोघांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर गरोदरपणाची घोषणा केली. आता गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर कतरिनाचा पहिला फोटो समोर आला आहे, ज्यात ती खूप आनंदी दिसत आहे.

खरं तर कतरिनाचा हा फोटो तिचा दीर आणि अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशल याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील आहे. सनी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला. कतरिना कैफच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

गरोदरपणाची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री दिसली आहे. फोटोमध्ये कतरिना तिच्या गरोदरपणाचा लूक दाखवताना दिसत आहे. अभिनेत्री मिनी माथुरने सनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये सनी कौशल, मिनी माथुर आणि कतरिनाची बहीण इसाबेल कैफदेखील दिसत आहेत. लाल आणि पांढरा ड्रेस परिधान केलेली अभिनेत्री तिच्या मित्रांबरोबर आनंदाने पोज देत आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर गरोदरपणाची घोषणा केली. कतरिना आणि विकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोघांचा हसत असलेला ब्लॅक अँड व्हाइट पोलरॉइड फोटो होता. या पोस्टमध्ये कतरिनाच्या पोटावर विकीने हात ठेवल्याचा फोटो पाहायला मिळत आहे आणि हाच फोटो दोघांनी हातात धरला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘आम्ही आमच्या आयुष्यातील एका सर्वांत सुंदर अध्यायाची सुरुवात करीत आहोत. आमचं मन आनंद आणि कृतज्ञतेनं भरून आलं आहे.” ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये कतरिना बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं जातंय; पण त्यावर अजून अधिकृत स्पष्टीकरण आलं नाहीये.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले होते. कामाच्या बाबतीत सांगायचे झाले तर, विकी लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याही भूमिका आहेत. कतरिना शेवटची विजय सेतुपतीबरोबर ‘मेरी क्रिसमस’मध्ये दिसली होती.