बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आली. कियारा सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. कियाराचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या कियारा तिच्या एका फोटो शूटमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी काढलेला एक फोटो कियाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर कियाराचे चाहते आणि सेलिब्रिटी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
आणखी वाचा : ‘अमृताला कानशिलात लगावली मला त्याच वाईट वाटतं नाही’, इशा देओलने केला खुलासा
कियाराने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. या फोटोत कियारा टॉपलेस असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘#dabbooratnanicalendar2021’, असे कॅप्शन कियाराने दिले आहे. डब्बू रत्नानी दरवर्षी त्याचं सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशित करतात. हा फोटो सेलिब्रिटी कॅलेंडर २०२१ साठी आहे. कियाराचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोला १४ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.
या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. आलिया भट्ट म्हणाली, ‘वाह…काय फोटो आहे.’ तर बॉलिवूड फोटोग्राफर डब्बू रत्नानीने ‘अति सुंदर’, अशी कमेंट केली आहे. फक्त सेलिब्रिटी नाही तर कियाराच्या चाहत्यांनी ही अशा अनेक कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा : Video : दोन महिन्यानंतर जुही घरी परतल्यानंतर मुलीने दिली अशी प्रतिक्रिया
कियाराने या आधी डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूटही केले होते, ज्यामध्ये ती एका मोठ्या पानाच्या मागे लपलेली दिसत होती. तिचा हा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून सोशल मीडियावर कियारा ट्रोल झाली होती.
दरम्यान, लवकरच कियारा ‘भूल भुलैया 2’, ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शशांक खेतानच्या पुढच्या चित्रपटात कियारासुद्धा दिसणार आहे. पण, अजून त्या चित्रपटाचे नाव काय आहे याचा खुलासा झालेला नाही.