Met Gala 2025 Updates : मनोरंजन विश्वात सध्या ‘मेट गाला’ सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. यंदा ‘मेट गाला २०२५’ मध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने पदार्पण केलं आहे. त्याच्यासह लवकरच आई होणारी अभिनेत्री कियारा अडवाणी, प्रसिद्ध गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ, उद्योजिका ईशा अंबानी असे अनेक सेलिब्रिटी ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर उपस्थित होते. या सगळ्या सेलिब्रिटींचे हटके लूक पाहा एका क्लिकवर…

Live Updates

Entertainment News Updates : मनोरंजन विश्वातील घडामोडी

09:56 (IST) 6 May 2025

Met Gala 2025 मध्ये गरोदर कियारा अडवाणीचा जबरदस्त डेब्यू, बेबी बंपवरील ‘हार्ट’ने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Kiara Advani Met Gala 2025 Look: ‘मेट गाला’च्या कार्पेटवरील कियारा अडवाणीचे फोटो अन् व्हिडीओ पाहा …सविस्तर बातमी
09:26 (IST) 6 May 2025

Met Gala 2025 : पोलका डॉट ड्रेस अन् स्टायलिश हॅट…; बॉलीवूड अभिनेत्री पाचव्यांदा पोहोचली ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर…

बॉलीवूडची देसी गर्ल पोलका डॉट ड्रेस अन् स्टायलिश हॅट असा लूक करून पाचव्यांदा Met Gala च्या रेड कार्पेटवर पोहोचली आहे. प्रियांका चोप्राचा लूक एकदा पाहाच…

09:12 (IST) 6 May 2025

Raid 2 Box Office Collection : रितेश देशमुखच्या Raid 2 सिनेमाच्या कमाईत मोठी घसरण, पाचव्या दिवशी कमावले फक्त…

रितेश देशमुख व अजय देवगण यांच्या मुख्य भूमिका असलेला Raid 2 सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सिनेमाने आतापर्यंत ७९ कोटींची कमाई केल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे. सोमवारी या सिनेमाच्या कमाईत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. पाचव्या दिवशी ‘रेड २’ने फक्त ७.७५ कोटी कमावले आहेत.

Raid 2 Collection

पहिला दिवस – १९.२५ कोटी

दुसरा दिवस – १२ कोटी

तिसरा दिवस – १८ कोटी

चौथा दिवस – २२ कोटी

पाचवा दिवस – ७.७५ कोटी

एकूण कलेक्शन – ७९ कोटी

09:07 (IST) 6 May 2025

Isha Ambani Met Gala 2025 : ईशा अंबानीचा लूक एकदा पाहाच…

08:56 (IST) 6 May 2025

Met Gala 2025 Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझचा लूक पाहिलात का?

मेट गाला-2025 मध्ये दिलजीत दोसांझचा रॉयल अंदाज

08:55 (IST) 6 May 2025
Met Gala 2025 Diljit Dosanjh : मेट गालाच्या रेड कार्पेटवर दिलजीत दोसांझचा रॉयल पंजाबी अंदाज…

मेट गाला-2025 मध्ये सहभागी होणारा दिलजीत दोसांझ हा पहिला पंजाबी अभिनेता ठरला आहे. त्याचा रॉयल पंजाबी लूक यावेळी लक्षवेधी ठरला…

Met Gala 2025 Diljit Dosanjh – दिलजीत दोसांझचे फोटो पाहा…

08:51 (IST) 6 May 2025

Met Gala 2025 मध्ये प्रेग्नंट कियारा अडवाणीचा हटके लूक….

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच आई होणार आहे. तिने ‘मेट गाला २०२५’च्या रेड कार्पेटवर पदार्पण करत आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.

Met Gala 2025 Met Gala 2025 : Kiara Advani Flaunts Baby Bump : कियारा अडवाणीचे मेट गालाचे फोटो पाहा…

08:47 (IST) 6 May 2025

Shah Rukh Khan At Met Gala 2025 : तो आला अन् त्याने जिंकून घेतलं…रेड कार्पेटवर शाहरुख खानचा जबरदस्त अंदाज

वयाच्या ५९ व्या वर्षी शाहरुख खाने ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं आहे. त्याच्या ‘किंग’ लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा लूक प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाईन केला आहे.

शाहरुख खानचे ‘Met Gala 2025’ मधील फोटो…

मेट गाला २०२५ अपडेट्स

‘मेट गाला २०२५’च्या रेड कार्पेटवर यावर्षी बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान, गायक दिलजीत दोसांझ आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी पदार्पण केलं आहे.