बॉलीवूड मध्ये कधीही न पाहिलेल्या अशा सत्य घटनेवर आधारित एक लक्षवेधी कथा लवकरच आपल्या भेटीला येत आहे.या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच याची जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटाचे नाव ‘भुज-द प्राइड ऑफ इंडिया’ असून यात आपल्याला अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत होता आणि आत्ता अखेर बहुचर्चित चित्रपट ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

हा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असला तरी याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारीत आहे. दमदार संवाद, उत्कृष्ठ दृश्य आणि एकूणच ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे. ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ हा  १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी  सांगणारा चित्रपटा आहे. यापूर्वी भारत पाकिस्तान युद्धावर आधारीत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र  चित्रपटात हवाई दलांनी युद्धातील केलेलं योगदान, ही पार्श्वभूमी ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ मध्ये बघायला मिळेल.

अजय देवगण या चित्रपटात ‘स्क्वाड्रन लीडर’ विजय कार्णिक यांची भूमिका साकारताना दिसेल. तसच सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, नोरा फतेही हे कलाकार देखील प्रमुख भुमिकेत झळकणार आहेत. ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुमच्या अंगावर काटा नक्कीच येईल.

दरम्यान सगळ्यांचे लक्षवेधून घेणारा चित्रपट ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ ऑगस्टच्या १३ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय.