अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, नृत्यांगना आहे. तर तिचा पती हिमांशू मल्होत्रा हिंदी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ते दोघं नेहमीच त्यांच्या आयुष्यामध्ये चर्चेत असतात. त्यांच्यातला बॉण्डिंग सर्वांनाच आवडतं. एकमेकांच्या कामांचं ते भरभरून कौतुक करत असतात. आता हिमांशूने दिलेल्या बोल्ड सीन्सवर अमृताची प्रतिक्रिया कशी होती हे त्याने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिमांशू लवकरच ‘मौका या धोका’ या वेब सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ही सिरीज म्हणजे ड्रामा सस्पेन्स याचं पॅकेज आहे. या सिरीजचा ट्रेकर नुकताच समोर आला. यामध्ये हिमांशू अगदी हटके भूमिकेत दिसणार आहे. तर यात त्याने बोल्ड सीन्सही दिले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर अमृताची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा त्याने ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’चा ट्रेलर पाहून अमृता खानविलकरने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली…

तो म्हणाला, “‘मौका या धोखा’ या सिरीजची झलक पाहिल्यावर अमृता मला म्हणाली होती की, मी काहीतरी नवीन करत आहे. नवनवीन भूमिका कराव्यात असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. तुम्ही आधीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळं केलंच पाहिजे. या सिरीजचा ट्रेलर पाहून अमृता मला म्हणाली, मी खूप छान दिसत आहे. जेव्हा तुमची बायको तुमचं कौतुक करते तेव्हा त्यांची खास असतं.”

हेही वाचा : अमृता खानविलकरने केदार शिंदेंच्या लेकीसाठी पाठवली खास भेट, फोटो पोस्ट करत सना म्हणाली…

बोल्ड सीन्सवरील अमृताच्या प्रतिक्रिया बद्दल बोलताना तो म्हणाला, “बोल्ड सीन्सबद्दल तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती. तिने सर्वात आधी पोस्टर पाहिलं आणि मग ट्रेलर पाहिला. ट्रेलर पाहून ती जोर जोरात हसू लागली. तिला माहित आहे की हे आमचं काम आहे. ती सुद्धा एक अभिनेत्री आहे आणि त्यामुळे या गोष्टी चांगल्या समजतात.” हिमांशूची ही सिरीज लवकरच ‘हंगामा फ्ले’वर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor himanshu malhotra revealed what was amruta khanvilkar reaction after watching his bold scene rnv