अभिनेता सलमान खानचे आगामी चित्रपट खूप चर्चेत आहेत. गेले अनेक महिने त्याचे चाहते ‘टायगर ३’ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट खूप चर्चेत आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच कोट्यवधी रुपये कमवत शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सर्वत्र पठाण चित्रपटाचा बोलबाला आहे. शाहरुख खान दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत आहे. आता अशातच या चित्रपटाला सलमान खानच्या ‘टायगर ३’ने मागे टाकलं आहे. ‘टायगर ३’ने प्रदर्शनाच्या आधीच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

आणखी वाचा : लग्नानंतर नवीन वास्तूत राहायला जाणार सिद्धार्थ-कियारा, घराची किंमत वाचून व्हाल आवाक्

शाहरुख खानच्या ‘पठाण’ प्रमाणेच सलमान खानचा ‘टायगर ३’ चित्रपटही प्रदर्शनाआधीच मोठी कमाई करू लागला आहे. रिपोर्टनुसार नुकतेच या चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकले गेले आहेत. ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने ‘टायगर ३’चे ओटीटी अधिकार ५० किंवा १०० नाही तर तब्बल २०० कोटींना विकत घेतले आहेत. या आधी ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने ‘पठाण’चे ओटीटी राइट्स १०० कोटींना विकत घेतले होते. तर या चित्रपटाच्या दुप्पट किमतीने ‘टायगर ३’चे ओटीटी अधिकार विकले गेले आहेत. त्यामुळे प्रदर्शनाआधीच ‘टायगर ३’ने ‘पठाण’ला मागे टाकलं आहे.

हेही वाचा : सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये शाहरुख करणार कॅमिओ? हिंट देत भाईजान म्हणाला…

‘एक था टायगर’ आणि ‘टायगर झिंदा है’ हे दोन्ही चित्रपट प्रचंड गाजले होते. या दोन्ही चित्रपटांनी मोठा गल्ला जमवला होता. या दोन्ही चित्रपटांचे यश बघता ‘टायगर ३’ही सुपरहिट होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर’ फ्रेंचायझीच्या तिसऱ्या भागात सलमान खानबरोबर अभिनेत्री कतरिना कैफही दिसणार आहे. 

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon prime video purchased tiger 3 ott rights for 200 crore rnv