बॉलिवूड निर्माता करण जोहर हा सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमुळे चांगलाच चर्चेत आहे. बॉलीवूडमधील बऱ्याच कलाकारांनी करणच्या या शोवर हजेरी लावलेली आहे. ‘कॉफी विथ करण ८’ च्या ताज्या भागात बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर व तिची धाकटी बहीण खुशी सहभागी झाल्या होत्या. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कॉफी विथ करण’मध्ये जान्हवीने खुशी व त्यांची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यात काय साम्य आहे याबाबतचा खुलासा केला. जान्हवी म्हणाली “चित्रपटाच्या शुटींगदरम्यान प्रत्येक वेळी खुशीची चेष्टा केली जायची ती शांत बसायची. पण कॅमेऱ्यासमोर तिला खूप भीती वाटायची. आमच्या आईबाबतीतही असेच घडत होते. दोघीही याबाबतीत सारख्या आहेत.”

तसेच जान्हवीने तिच्या लव्हलाईफबाबतही मोठा खुलासा केला. करण जोहरने जान्हवीला तू शिखर पहारियाला डेट करत आहेस का? असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना जान्हवी म्हणाली, “हो मी शिखरला डेट करत आहे. तो सुरुवातीपासूनच माझ्या आणि माझ्या कुटुंबाबरोबर एका चांगल्या मित्रासारखा आहे. माझ्याकडून कधीही काहीच नको होतं, तो फक्त माझ्याबरोबर होता.” असेही जान्हवी म्हणाली.

हेही वाचा- ‘Killer Soup’, वेबसीरिजचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; कोंकणा सेनशर्मा आणि मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत

खुशी कपूरने नुकतेच झोया अख्तरच्या द आर्चीज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनीही डेब्यू केला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor on how khushi kapoor is similar to their late mother sridevi