कॉफी विथ करणचा आठवा सीझन सुरू आहे. करण जोहरच्या या चॅट शोचा नवा एपिसोड दर गुरुवारी प्रसारित होतो. आतापर्यंत याचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. आठव्या सीझनची सुरुवात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने यांनी हजेरी लावून केली. दुसऱ्या एपिसोडमधील सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघे बंधु पाहुणे म्हणून आले तर तिसऱ्या भागात सारा अली खान व अनन्या पांडे या स्टारकिड्सनी हजेरी लावली. आता याच्या पुढील भागाबद्दल लोकांना उत्सुकता लागून राहिलेली असतानाच याबद्दल एक नवी माहिती समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रीपोर्टनुसार लवकरच सलमान खान ‘कॉफी विथ करण’च्या सीझन ८ मध्ये हजेरी लावणार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘इंडिया टूडे’च्या वृत्तानुसार करण जोहर या नव्या सीझनमध्ये सलमानला आमंत्रित करणार आहे, याबद्दल करणने सलमानशी चर्चादेखील सुरू केली आहे. असंही सांगितलं जात आहे या सीझनची सांगता सलमान खानच्या उपस्थितीनने होईल.

आणखी वाचा : सलमानचा ‘टायगर ३’ पाहायला जाणार आहात? ‘या’ ९ गोष्टी तुमचा चित्रपट पाहायचा आनंद द्विगुणित करतील

सध्या तरी या शोचे निर्माते सलमानबरोबर उपस्थित राहू शकेल अशा एका सेलिब्रिटी स्टारच्या शोधात आहे. अद्याप सलमानने याबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही. सलमान खान याआधी दोनदा ‘कॉफी विथ करण’मध्ये आला आहे. चौथ्या सीझनमध्ये सलमान पहिल्यांदाच या शोमध्ये पोहोचला होता. त्याच्यासोबत त्याचे वडील सलीम खानही आले होते. २०१६-१७ मध्ये रिलीज झालेल्या ‘कॉफी विथ करण’च्या पाचव्या सीझनमध्ये तो त्याचे भाऊ अरबाज आणि सोहेलसह हजर होता. \

करणच्या शोमध्ये पाहुण्यांच्या एका जोडीला आमंत्रित करणे ही एक परंपरा बनली आहे. त्यामुळे आठव्या सिझनसाठी सलमानच्या जोडीदाराचा शोध सध्या निर्माते घेत आहेत. सध्या अशी चर्चा आहे की या सीझनमध्ये सलमान कतरिना कैफ किंवा इम्रान हाशमीसह हजेरी लावणार आहे. सध्या या तिघांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट चर्चेत आहे त्यामुळे सलमान या दोघांपैकी एकाबरोबर करण जोहरच्या शोवर हजेरी लावणार अशी चर्चा आहे. सध्या तरी करणच्या शोमधील पुढील भागात करीना कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, रोहित शेट्टी, काजोल व राणी मुखर्जी हजेरी लावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

याशिवाय ‘कुछ कुछ होता है’नंतर तब्बल २५ वर्षांनी करण जोहर सलमानला घेऊन एक चित्रपट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल ज्यामध्ये सलमान पॅरा मिलिटरी ऑफिसरच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. ‘शेरशाह’ फेम विष्णू वर्धन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत तर करण जोहर याची निर्मिती करणार आहे. असंही म्हंटलं जात आहे की हा चित्रपट भविष्यात ‘यश राज फिल्म्स’च्या स्पाय युनिव्हर्सचा हिस्सा होऊ शकतो. अद्याप याबद्दल ठोस माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan to be part of koffee with karan season 8 with this celebrity avn