Know The Bads of Bollywood full cast fees: गेल्या आठवड्यात आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. सध्या ही वेब सीरिज खूप चर्चेत आहे. याबरोबरच नेटफ्लिक्सवर पहिल्या नंबरवर ट्रेंड करत आहे. शाहरुख खानच्या मुलाने म्हणजेच आर्यनने या सीरिजमधून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये अनेक कलाकार दिसत आहेत. बॉलीवूडमधील काही लोकप्रिय कलाकारांची झलकदेखील पाहायला मिळत आहे. रणबीर कपूर, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, एसएस राजामौली, बादशाह, रणवीर सिंग, सिद्धांत चतुर्वेदी, करण जोहर, सारा अली खान, राजकुमार राव, दिशा पटानी यांची झलकदेखील पाहायला मिळत आहे. या कलाकारांनी यामध्ये कॅमिओ केला आहे.
याबरोबरच बॉबी देओल, मोना सिंग, लक्ष्य, राघव जुयाल हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. लक्ष्य आणि राघव जुयाल यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने लक्ष वेधून घेतले आहे. आता या कलाकारांनी त्यांच्या भूमिकेसाठी किती मानधन घेतले आहे हे जाणून घेऊ…
‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधील कलाकारांचे मानधन किती?
१. आर्यन खान
बिग टीव्ही लाईव्हच्या मते, शोचा निर्माता, दिग्दर्शक आणि सह-लेखक आर्यन खानने त्याच्या पदार्पणासाठी १०-१२ कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे, त्यामुळे तो सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांपैकी एक ठरला आहे.
२. राघव जुयाल
‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये राघवने परवेझ ही भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील त्याचे काही सीन सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहेत. एशिया नेटानुसार राघवला २ ते २.५ कोटी मानधन देण्यात आले आहे.
३. लक्ष्य
लक्ष्यने या सीरिजमध्ये आसमान ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने २ ते ३ कोटी रुपये मानधन घेतल्याचे एशिया नेटने वृत्त दिले आहे.
रिपोर्ट्सनुसार, सहेर बंबा आणि अन्या सिंग या अभिनेत्रींना त्यांच्या भूमिकांसाठी १.५ ते २ कोटी मानधन देण्यात आले आहे; तर मोना सिंग, गौतमी कपूर, मनीष चौधरी, मनोज पाहवा यांचे मानधन सुमारे ८० लाख रुपये आहे.
दरम्यान, एकीकडे या शोचे कौतुक होत असले, तरी दुसरीकडे ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधील काही सीनवरून वाददेखील होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. रणबीर कपूरने एका सीनमध्ये ई-सिगारेट ओढल्याचे पाहायला मिळाले. महत्त्वाचे म्हणजे तो सिगारेट ओढत असताना कोणतीही चेतावणी अथवा डिस्क्लेमर दिला नाही, अशी तक्रार विनय जोशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली. या सीनमुळे इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ चे उल्लंघन केले आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिसांना इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ चे उल्लंघन करून त्याची जाहिरात, शूटिंग किंवा प्रमोशन केल्याबद्दल अभिनेता रणबीर कपूर आणि ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.