मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. गेली अनेक वर्ष दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना आनंद देत आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रंगभूमीवर नाटकांचे विक्रमी १२ हजार ५०० हून अधिक प्रयोग करणारे ते अभिनेते. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना भरभरून प्रेम मिळालं. अनेक दिग्गज कलाकारांबरोबरही खूप चांगलं बॉंडिंग आहे. यातीलच एक म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ प्रशांत दामले यांना एका खास नावाने हाक मारतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रशांत दामले आणि अशोक सराफ यांनी ‘आयत्या घरात घरोबा’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘प्रेमांकुर’, ‘आनंदी आनंद’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी स्क्रीन शेअर केला नसला तरी त्यांच्यातलं प्रेम आणि जिव्हाळा हा आजही तसाच आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशांत दामले यांनी अशोक मामा त्यांना कोणत्या नावाने हाक मारतात हे गुपित उघड केलं.

आणखी वाचा : “मराठी रंगभूमीला मानाचे स्थान…” सचिन तेंडुलकरची ‘विक्रमवीर’ प्रशांत दामलेंसाठी खास पोस्ट

प्रशांत दामले हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. विविध पोस्ट शेअर करत ते त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांना सांगत असतात. त्याचबरोबर त्यांच्या नाटकांच्या प्रयोगांची माहिती, प्रयोगादरम्यान किमात प्रयोगाच्या दौऱ्यादरम्यान घडणारे किस्से चाहत्यांची शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर त्यांच्या चाहत्याने केलेल्या कमेंटवर प्रशांत दामले यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं होतं.

हेही वाचा : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

प्रशांत दामले यांनी जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीनिमित्त ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या नाटकाच्या टीमबरोबर एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर कमेंट करत त्यांच्या एका चाहत्याने लिहिलं होतं, “सेम टू यू. दांबले सर, पुन्हा हा प्रयोग गडकरी रंगायतन ठाणे येथे कधी होईल? वाट पाहतोय.” यावर उत्तर देत प्रशांत दामले यांनी लिहिलं होतं, “दांबले हे आवडलं. अशोकमामा मला प्रेमाने अशी हाक मारतो.” त्यांच्या या उत्तरावर त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant damle had revealed what does ashok saraf call him rnv