अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५००वा नाट्यप्रयोग सादर केला. प्रशांत दामले नाट्यसृष्टीत जितके सक्रीय असतात तितकेच सक्रिय ते सोशल मीडियावरदेखील असतात. सोशल मीडियावरून ते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता नुकतंच त्यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाला दर्जाहीन म्हणणाऱ्याला त्यांनी त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावर सक्रिय राहून ते नाटकांच्या प्रयोगादरम्यान आलेले अनुभव चाहात्यांची शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच ते त्यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगासाठी संभाजीनगर येथे गेले होते. प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी तेथील रस्त्याची अवस्था कशी आहे हे चाहत्यांची शेअर केलं होतं. त्याची बातमी एका न्यूज पोर्टलने केली आणि त्या बातमीवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या.

What Samantha Said?
‘निरागस पतीला का फसवलंस?’, ट्रोलरच्या प्रश्नावर समांथाचं रोखठोक उत्तर, म्हणाली..
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

आणखी वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

या बातमीवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं “मुळात हे पुढची गोष्ट नाटकच अतिशय फालतू आणि दर्जाहीन आहे. त्या गोष्टीत काहीही जीव नाही.” नेटकऱ्याच्या या कमेंटवर प्रशांत दामले यांनीही त्यांच्या स्टाईलने सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी लिहिलं, “बरं… त्याच नाटकाचे ५४७ प्रयोग झाले आहेत. प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो की.” त्यांच्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : “मराठी रंगभूमीला मानाचे स्थान…” सचिन तेंडुलकरची ‘विक्रमवीर’ प्रशांत दामलेंसाठी खास पोस्ट

दरम्यान प्रशांत दामले यांची ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘सारखं काहीतरी होतंय’ ही दोन नाटकं रंगभूमीवर सुरु आहेत. या दोन्ही नाटकांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय.