तुरुंगातून बाहेर आल्यापासून ‘शॉक’मध्ये आहे आर्यन खान, एकटेपणात घालवतोय वेळ

आता आर्यन खानला दिल्ली एनसीबीच्या एसआयटीने समन्स बजावले आहे.

aryan khan,
आता आर्यन खानला दिल्ली एनसीबीच्या एसआयटीने समन्स बजावले आहे.

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर जवळपास महिनाभर तुरुंगात होता. आर्यनसाठी तुरुंगातील अनुभव धक्कादायक होता आणि यातून सावरण्यासाठी त्याला बराच वेळ लागू शकतो असे सांगण्यात येत आहे. शाहरुखच्या कुटुंबीयांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की, तुरुंगातून परतल्यानंतरही आर्यन अजूनही ‘शॉक’मध्ये आहे.

‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, तुरुंगातून आल्यानंतर आर्यन पूर्णपणे शांत आणि एकटा राहू लागला आहे. एका जवळच्या सूत्राचा हवालाने रिपोर्ट देत त्यांनी सांगितले की आर्यन कोणाशीही जास्त बोलत नाही आणि एकटा राहतो. आर्यन बहुतेक वेळा त्याच्या खोलीतच राहतो आणि त्याला बाहेर जाऊन मित्रांना भेटण्यची इच्छा नाही. आर्यनचा शांत स्वभाव आहे, पण तुरुंगातून परतल्यानंतर तो पूर्णपणे शांत झाला आहे.

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्तर

सध्या शाहरुख आर्यनसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अजुन त्याने चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केलेली नाही. शाहरुख दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत सक्रिय होणार आहे. तो पठान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच जॉन आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर सलमान खान या चित्रपटात पाहूण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Report claims aryan khan is traumatized by the prison experience dcp

Next Story
कपिल शर्मा करणार होता आत्महत्या, शाहरुख खान आला मदतीला धावून
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी