अभिनेता संजय दत्तने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एवढेच नाही तर त्याने माधुरी, श्रीदेवी, काजोल सारख्या अनेक मोठ्या अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की संजयने त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर इंटिमेट सीन्स दिले होते.
आम्ही बोलत आहोत ऐश्वर्या रायबद्दल. संजयने त्याच्या कारकिर्दीत ऐश्वर्या रायबरोबर दोन चित्रपट केले आहेत. त्यापैकी एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्याचे बजेटही वसूल करू शकला नाही आणि तो सुपर फ्लॉप ठरला. ऐश्वर्या राय ही संजय दत्तपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शब्द’ चित्रपटात दोघांनीही काम केले होते. या चित्रपटात दोघांमध्ये काही इंटिमेट सीन्सही पाहायला मिळाले होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन लीना यादव यांनी केले होते. या चित्रपटात मोठे कलाकार होते, परंतु लोकांना त्याची कथा आवडली नाही आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. ‘शब्द’ हा एक सायकॉलॉजिकल ड्रामा सिनेमा होता. १० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या ‘शब्द’ चित्रपटाने त्याच्या बजेटच्या फक्त निम्मीच कमाई केली.
या चित्रपटानंतर संजय दत्त आणि ऐश्वर्या राय यांची जोडी पुन्हा कधीच एकत्र दिसली नाही. हा चित्रपट ४ फेब्रुवारी २००५ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संजय दत्त आणि ऐश्वर्या राय यांच्याबरोबर जायद खानही प्रमुख भूमिकेत होता.
‘शब्द’पूर्वी संजय दत्त आणि ऐश्वर्या राय यांनी ‘हम किसी से काम नहीं’मध्ये काम केले आहे. हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘हम किसी से काम नहीं’मध्ये संजय दत्त आणि ऐश्वर्या व्यतिरिक्त अजय देवगण आणि अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
‘हम किसी से कम नहीं’मध्ये अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारली होती. चित्रपटात अजय आणि संजय दोघेही ऐश्वर्याच्या प्रेमात पडतात. हा एक उत्तम अॅक्शन कॉमेडी चित्रपट होता. संजय दत्त गेल्या चार दशकांपासून सोशल मीडियासह सिनेसृष्टीत सक्रिय आहे.