बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सारा चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता साराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरून तिला ट्रोल करण्यात आले आहे. यावेळी तिला मुस्लीम असल्याची लाज वाटली पाहिजे असे काही नेटकरी म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारा तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी गुवाहाटीला गेली आहे. त्यामुळे सारा आसाम मधील सगळ्यात लोकप्रिय आणि५१ शक्तिपीठां पैकी एक कामाख्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेली. तिथले काही फोटो साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. त्यानंतर साराला सोशल मीडियावर तिच्या धर्मावरून ट्रोल करण्यात आले.

आणखी वाचा : ‘नावांमुळे सैफ आणि करीनाची मुलं यशस्वी अभिनेते होणार नाहीत’, अभिनेत्याने केली भविष्यवाणी

साराची आई अमृता सिंग शीख आणि वडील सैफ अली खान मुस्लीम असल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला मंदिरात गेल्यामुळे ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘तू मुस्लीम आहेस की हिंदू?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मुस्लिमांच्या नावावर कलंक आहेस, भावासोबत २ पीसमध्ये पोज देणारी बेशरम मुलगी..जहन्नमी.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तुला लाज वाटायली हवी, तू मुस्लिम आहेस.’ तर काही नेटकऱ्यांनी साराची स्तुती केली आहे.

मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल

आणखी वाचा : ‘दादां’ची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता?; सौरव गांगुलींवर येणार बायोपिक

दरम्यान, साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होतो. तर, काही दिवसांपासून सारा ‘अतरंगी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धानूष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan trolled for visiting a hindu temple netizens asks you are a muslim shame on you dcp