Sara Ali Khan Visits Kedarnath : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा केदारनाथला गेली आहे. तिने तिच्या आध्यात्मिक प्रवासाची एक झलक तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सोशल मीडियावर तिने शेअर केलेले अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

सारा अली खानने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पोस्टमध्ये तिने केदारनाथबद्दल सांगितले, जे तिच्या हृदयाच्या जवळचे ठिकाण आहे. साराने स्पष्ट केले की, जर जगात असे एक ठिकाण असेल, जे पूर्णपणे तिचे स्वतःचे वाटते, तर ते केदारनाथ आहे.

सारा अली खान पोस्ट

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये साराने केदारनाथचे सौंदर्य, तेथील शांत पर्वतीय वातावरण आणि तिथल्या लोकांशी असलेले तिचे नाते दाखवले. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “जय श्री केदारनाथ, जगातील अशी एक जागा जी पुर्णपणे ओळखीची वाटते. दरवेळी मला चकित आणि आश्चर्यकारण करते. माझ्या जवळ सगळं काही आहे. मला हे सगळं देण्यासाठी आणि मला यशस्वी बनवण्यासाठी धन्यवाद. मी जी काही आहे ती तुमच्यामुळे आहे.”

फोटो आणि व्हिडीओमध्ये ती हसताना दिसते. कधी कधी ती उन्हात बसलेली दिसते, तर कधी कधी लोकांशी बोलताना दिसते. एका व्हिडीओमध्ये ती गावातील मुलांना आणि महिलांना भेटते. केदारनाथला भेट देण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही. तिने भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक वेळा मंदिराला भेट दिली आहे. तिने गेल्या ऑक्टोबरमध्येही भेट दिली होती. त्यावेळी तिने मंदिर, मंदाकिनी नदी आणि आकाशात तरंगणाऱ्या ढगांचे फोटो शेअर केले होते.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सारा अली खान लवकरच आयुष्मान खुरानाबरोबर ‘पती, पत्नी और वो 2’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०१९ च्या सुपरहिट ‘पती पत्नी और वो’चा सीक्वेल आहे, ज्यात यापूर्वी कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर व अनन्या पांडे यांनी भूमिका केल्या होत्या. सारा नुकतीच अनुराग बसूच्या ‘मेट्रो… इन दिनों’मध्ये देखील दिसली, जिथे तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.