"मीदेखील पठाणची वाट पाहतोय" असं म्हणत हटके स्टाईलमध्ये शाहरुखने शेअर केला खास 'पठाण'लूक | shahrukh khan is also waiting for pathaan shares his dashing bare body look on social media | Loksatta

“मीदेखील पठाणची वाट पाहतोय” असं म्हणत हटके स्टाईलमध्ये शाहरुखने शेअर केला खास ‘पठाण’लूक

शाहरुखच्या चाहत्यांना त्याचा हा खास पठाण लूक फारच आवडला आहे.

“मीदेखील पठाणची वाट पाहतोय” असं म्हणत हटके स्टाईलमध्ये शाहरुखने शेअर केला खास ‘पठाण’लूक
शाहरुख पठाण | shahrukh khan in pathan

सध्या शाहरुख खान चांगलाच चर्चेत आहे. गेली ३ वर्षं चित्रपटात न झालकणारा शाहरुख आता येणाऱ्या वर्षात तब्बल ३ चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या या तीनही चित्रपटांसाठी त्यांचे चाहते प्रचंड आतुर आहेत. ‘पठाण’, जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटातून शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यापैकी त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. खरंतर ‘पठाण’ याचवर्षी प्रदर्शित होणार होता पण काही कारणास्तव तो पुढे ढकलला गेला.

‘पठाण’च्या सेटवरचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. लोकं शाहरुखच्या नव्या लूकसाठी प्रचंड उत्सुक आहेत. अशातच नुकतंच शाहरुखने एक पोस्ट करत तोदेखील पठाणची वाट पाहत असल्याचं सांगितलं आहे. शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या ‘पठाण’लूकमध्ये दिसत आहे. बरोबरच तो या फोटोमध्ये शर्टलेस बसला आहे आणि त्याचे सिक्स पॅक दाखवत आहे. शाहरुखचा हा फोटो पाहून चाहत्यांनी त्यावर प्रचंड कॉमेंट करायला सुरुवात केली आहे. त्यांना शाहरुखचा हा लूक प्रचंड आवडला आहे.

आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र’च्या पुढील भागात ‘जुनून’ हे पात्र दिसणार का? अभिनेत्री मौनी रॉयने केला खुलासा

हा फोटो शेअर करताना सिलसिला चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची एक कविता त्याने आपण न घातलेल्या शर्टला उद्देशून लिहिली आहे. या कवितेतल्या ४ ओळी लिहून त्याने खाली लिहिलंय की “मीसुद्धा पठाणची वाट पाहतोय.” शाहरुखचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे शिवाय त्याचा चाहते हे त्याच्या या बेअर बॉडीमधील लूकच्या प्रेमातच पडले आहेत.

शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. शाहरुखबरोबर या चित्रपटात जॉन अब्राहम, दीपिका पदूकोण हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. सोशल मिडीयावर मध्यंतरी बॉयकॉट पठाण हा ट्रेंड व्हायरल होत असला तरी एक खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे जो शाहरुखच्या ‘पठाण’साठी उत्सुक आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ‘पठाण’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नव्व्दच्या दशकात ‘सलमानचा आवाज’ म्हणून एस. पी. बालसुब्रमण्यम यांना ओळखले जात होते

संबंधित बातम्या

“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
“पुष्पानंतर आता…” अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा मुलाखतीदरम्यान खुलासा
बहुचर्चित ‘अवतार २’ केरळमध्ये होणार नाही रिलीज; चित्रपटगृहाच्या मालकांचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण
“तिच्याशी लग्न करण्याशिवाय…” नागा चैतन्यने केला त्याच्या आणि समांथाच्या नात्याबद्दल मोठा खुलासा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मी घरोघरी जाऊन…” शाळेत नापास झाल्यावर मधुर भांडारकर यांनी केला ‘हा’ व्यवसाय; दिग्दर्शकाने सांगितली आठवण
गश्मीर महाजनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार प्रमुख भूमिकेत
विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये शेवटचे साखळी सामने एकाच वेळी का खेळवतात? काय होता १९८२मधील ‘लाजिरवाणा सामना’?
पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याच्या मोदींच्या धोरणाला गती; दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपकडून चार उमेदवार रिंगणात
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्लेंची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू