scorecardresearch

‘ब्रह्मास्त्र’च्या पुढील भागात ‘जुनून’ हे पात्र दिसणार का? अभिनेत्री मौनी रॉयने केला खुलासा

‘ब्रह्मास्त्र’मध्ये प्रथम मौनीला एक छोटी भूमिका देण्यात आली होती.

‘ब्रह्मास्त्र’च्या पुढील भागात ‘जुनून’ हे पात्र दिसणार का? अभिनेत्री मौनी रॉयने केला खुलासा
मौनी रॉय | mouni-roy

आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने २५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. एकंदरीतच चित्रपटाला अपेक्षेपेक्षा सिनेरसिकांनी अधिक पसंती दर्शवली. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये मौनी रॉयने बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांबरोबर कौतुकास्पद काम केलं. चित्रपटाला मिळालेल्या यशाबाबत मौनी फारच खूश आहे.

ब्रह्मास्त्रची कथा ही ३ भागात उलगडणार असून पहिल्या भागात आपल्याला ‘शिवा’ची कहाणी बघायला मिळाली. याचा दूसरा भाग याच चित्रपटातील ‘देव’ या पात्रावर बेतलेला असेल आणि यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण हे दोघे दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मधील देवला मानणारं एक पात्र आहे. चित्रपटात हे पात्र म्हणजेच ‘जुनून’चं पात्र मौनी रॉयने साकारलं आहे. मौनीच्या या पात्रालाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा : ‘या’ दिवशी होणार प्रभासच्या ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित; तयारीसाठी साऱ्या टीमने गाठलं अयोध्या

पहिल्या भागात तिच्या पात्राचा शेवट केल्याने प्रेक्षकांच्या मनात तिच्या चित्रपटातील पुढील प्रवासाबद्दल शंका निर्माण झाल्या आहेत. याच शंकेचं निरसन मौनीने केलं आहे. एका मीडिया हाऊसशी चर्चा करताना मौनीने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “मी या चित्रपटाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागातही दिसेन अशी आशा करते, बाकी तुम्ही दिग्दर्शकाला विचारा की ते मला पुढील भागात घेणार आहेत की नाही?”

‘ब्रह्मास्त्र’मध्ये प्रथम मौनीला एक छोटी भूमिका देण्यात आली होती. नंतर तिला या चित्रपटात खलनायिकेची भूमिका देण्यात आली. तब्बल ८ वर्षं मेहनत घेऊन बनवलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याच्या पुढच्या भागांची उत्सुकता सगळ्याच प्रेक्षकांना आहे. दूसरा आणि तिसरा भाग याहून आणखीन भव्य असेल अशी ग्वाही दिग्दर्शन अयान मुखर्जीने दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या