अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या विविध माध्यमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून त्या त्यांच्या संपर्कात असतात. तर आता त्यांनी त्यांचा लेक आणि सूनेसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराज कुलकर्णी आणि सून शिवानी रांगोळे गेली अनेक वर्ष मनोरंजन सृष्टीत काम करत आहेत. तर त्या दोघांनाही प्रेक्षकांचा नेहमीच खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. दोघे जण यशाच्या पायऱ्या चढत आहेत. तर आता त्यानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी एक पोस्ट लिहित त्या दोघांचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : “प्रिय शिवानी, तू आल्यापासून जाणवतंय…”; मृणाल कुलकर्णींची सूनबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

मृणाल कुलकर्णी यांनी नुकताच त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शिवानी काम करत असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा आणि अधिपती यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं, “शिवानी आणि विराजस, तुम्ही दोघेही एकमेकांना सपोर्ट करत उत्तम प्रगती करत आहात याचा खूप आनंद आहे. शिवानीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे आणि आज तुझी नाट्यसंस्था Theatron बारा वर्षाची होणार ! तुमच्या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद आहे हे किती मस्त ! सहाही नाटक धमाल उडवून देतात. दोघेही अशीच मेहनत करा. खूप खूप यश मिळवा. ‘टीम तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘टीम Theatron’ खूप खूप शुभेच्छा !!”

हेही वाचा : “सोनपरी ते सुभेदार…तुम्ही आहात तशाच आहात,” अखेर मृणाल कुलकर्णींनी सांगितलं त्यांचं फिटनेस सिक्रेट, म्हणाल्या…

तर आता त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. या त्यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते शिवानी आणि विराजसच्या कामाचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress mrunal kulkarni writes special post for shivani rangole and virajas kulkarni rnv