अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. गेली अनेक वर्ष शिवानी आणि विराजस यांची मैत्री असल्याने विराजसच्या कुटुंबियांशीही शिवानीचे लग्नाआधीच खूप छान बॉण्डिंग तयार झाले. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. अनेकदा त्या समारंभांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. आज शिवानीच्या वाढदिवसानिमित्त सासूबाईंनी म्हणजेच मृणाल कुलकर्णी यांनी तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा : ‘३६ गुण’ चित्रपटात पुष्कर श्रोत्रीची वर्णी, साकारणार ‘ही’ भूमिका

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

मृणाल कुलकर्णी यांची सून अभिनेत्री शिवानी रांगोळे हिचा आज वाढदिवस. यानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी शिवानीसाठी एक खास पोस्ट लिहित तिला गोड शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी शिवानीवर असलेलं प्रेम तर व्यक्त केलंच, पण त्यासोबतच तिला काही सूचनाही केल्या आहेत.

मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, “प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय मुलगी असण्याचं सुख ! ‘ घरात एक मुलगी असायला हवी ‘ म्हणजे काय याचा अर्थ आत्ता कळतोय. लगबग , गडबड ,धांदल , हसण्याच्या लकेरी .. विराजसची मैत्रीण ते आमची सून हा प्रवास तू मस्त पार पाडला आहेस. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आम्हाला तुझं कौतुक आहेच, पण नात्यांमधला गोडवा टिकवण्यासाठी तू नेहेमीच प्रयत्न करतेस हे विशेष महत्त्वाचे.. दोन्ही आज्या तुझ्यावर जाम खूश आहेत ! आपल्या माणसांवर प्रेम करणे आणि ते योग्य पद्धतीने दाखवता येणे हे खूप महत्त्वाचे असते आणि ते आयुष्यभर करायचे असते हे नेहेमी लक्षात ठेव.”

पुढे त्या म्हणाल्या, “आता हळूहळू तुझं काम सुरू झालंय..प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात तब्येत सांभाळणं लक्षात ठेव… डाएट चा अतिरेक नको ! सगळं खायचं आणि व्यायाम चुकवायचा नाही ! हे वर्ष अनेकार्थानी इव्हेंटफूल गेलंय.. अशीच यापुढली ही सारी वर्ष मनाजोगती जाऊदे ! हॅप्पी बर्थडे…” मृणाल कुलकर्णी यांच्या या पोस्टमधून त्या दोघींमधलं नातं किती सुंदर आणि घट्ट आहे, हे पुन्हा एकदा दिसून आलं. यावर मृणाल कुलकर्णी आणि शिवानीचे चाहते कमेंट्स करत शिवानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेकांनी ही पोस्ट आवडल्याचे कमेंट्स करत सांगितलं आहे.

हेही वाचा : Photos : १९व्या वर्षी लग्न अन् ३२ वर्षांचा सुखी संसार, मृणाल कुलकर्णी यांचे पतीबरोबरचे सर्वात सुंदर फोटो

दरम्यान, मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘फक्त महिलांसाठी’ असं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी जवळपास ८ वर्षांनी दिग्दर्शिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.