Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चं १८वं पर्व आता मध्यावर आलं आहे. सध्या नववा आठवडा सुरू आहे. तसंच यंदाच पर्व १०० दिवसांपेक्षा अधिक दिवस होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण, घरातील सदस्यांमध्ये सातत्याने मारामारी आणि भांडणं होत आहेत. आतापर्यंत बऱ्याचदा हिंसा झाली आहे. पण, याविरोधात ‘बिग बॉस’ने कठोर पाऊल उचललं नाही. मात्र, आता सलमान खान अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांच्याकडून झालेल्या शारिरीक हिंसेविरोधात महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अविनाश मिश्रा आणि रजत दलाल दिग्विजय राठीच्या अंगावर धावून त्याला ढकलताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर अविनाश दिग्विजयचं टी-शर्ट आणि गळा पकडून शारीरिक हिंसा करताना दिसत आहे. या हिसेंमागचं कारण ईशा सिंह आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: “तुला लाज वाटली पाहिजे”, रजत दलालची शिल्पा शिरोडकरवर टीका; म्हणाला, “तुझ्यात ताकद असेल तर…”

‘बिग बॉस तक’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’ने सदस्यांना पार्ले-जी टास्क दिला होता. या टास्कमध्ये दिग्विजय राठी विजेता झाला. त्यामुळे त्याला पार्ले-जी बिस्किट्स मिळाले. यामधून ईशाने एक बिस्किट घेतलं. ज्यामुळे दिग्विजय भडकला आणि तो ईशा म्हणाला, तू बिस्किट विचारून घेतलं पाहिजे होतं. यावरून अविनाश भांडायला सुरुवात करतो. यावेळी दिग्विजय अविनाशला धक्का देतो. त्यामुळे या भांडणाचं रुपांतर शारिरीक हिंसेत होतं. अविनाश रागाच्या भरात दिग्विजयची कॉलर पकडून धक्काबुकी करतो.

हेही वाचा – Bigg Boss 18: शोमध्ये येण्याआधी शिल्पाचं बहीण नम्रता शिरोडकरशी झालं होतं भांडण, भावुक होत अनुराग कश्यपला म्हणाली, “दोन आठवडे…”

त्यानंतर अविनाश आणि दिग्विजयच्या भांडणात रजत दलाल येतो. तो दिग्विजयला मारण्यासाठी धावतो. पण, विवियन मध्ये येऊन रजतला शांत करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी विवियन दिग्विजयला ओरडतो. तेव्हा दिग्विजय म्हणतो, “सर्वात आधी कमेंट अविनाश आणि ईशाने केली होती.”

हेही वाचा – ‘आवेशम’ फेम मल्याळम अभिनेता ‘या’ अभिनेत्रींसह बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण, इम्तियाज अली असणार चित्रपटाचे दिग्दर्शक

अविनाश, रजत आणि दिग्विजयच्या भांडणात कोण बरोबर आणि कोण चुकीच याचा निर्णय वीकेंड वारला सलमान खान घेणार आहे. पण, याआधी देखील अविनाश, रजत यांच्याकडून शारीरिक हिंसा झाल्यामुळे आता सलमान खान कठोर निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 avinash mishra rajat dalal and digvijay rathee physical fight for isha singh watch promo pps