Bigg Boss Marathi Season 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी टास्क सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या टास्कमध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, योगिता, सूरज, निखिल यांच्या टीमने बाजी मारली. ही ‘ए’ टीम जिंकल्यामुळे यामधल्या एकूण ७ स्पर्धकांना कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी संधी मिळाली. आता घरात ‘फास्ट फूड’ हा नवीन टास्क पार पडत आहे. आता यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिजीतच्या ‘बी’ टीमने निक्कीच्या टीममधील सगळ्या स्पर्धकांना क्रमावारीनुसार फ्रेंच फ्राइसचं वाटप केलं. आता हे सात जण आजच्या भागात आपल्या फ्रेंच फ्राइसचं रक्षण करताना दिसणार आहेत. कॅप्टनसीसाठी अरबाज, जान्हवी आणि निक्की एकत्र ग्रुप करून खेळणार आहेत. तिघेही एकाच टीममध्ये असल्याने इतर स्पर्धकांवर अटॅक करणं यांना सहज शक्य होणार आहे. परंतु, या सगळ्यात सूरज चव्हाण पहिल्यांदाच घरात त्यांचं रौद्ररुप दाखवणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणला प्रेमात मिळालेला धोका, निक्की तांबोळीला सांगत म्हणाला, “माझ्याबरोबर चांगली असायची पण…”

सूरज अरबाजशी घेणार पंगा

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात पहिल्या दिवसापासून सूरज शांतपणे खेळत होता. तर, प्रत्येक टास्कमध्ये प्रेक्षकांना अरबाजची दादागिरी पाहायला मिळाली आहे. परंतु, आता पहिल्यांदाच सूरज थेट अरबाजशी पंगा घेणार आहे. सूरजचं रुप पाहून टास्कबाहेर असणारा वैभव देखील त्याला ताकीद देण्याचा प्रयत्न करतो. पण, घडतं सगळं उलटचं…वैभवने वाद घालायला सुरुवात केल्यावर “त्याला हाणलं नाहीये मी अजून…माझं मी बघेन” असं सूरज वैभवला ठणकावून सांगतो. यानंतर सूरज आपलं रौद्ररुप दाखवत निक्की, जान्हवी आणि अरबाजशी भांडण करत असल्याचं या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडणार”, विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचा व्हायरल झालेला टीझर पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

हेही वाचा : Bigg Boss Marathi: निक्की-अरबाजच्या मैत्रीत पडला मिठाचा खडा, ‘या’ व्यक्तीमुळे कडाक्याचं भांडण, नेमकं काय घडलं? पाहा

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाण ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

दरम्यान, सूरज पहिल्यांदाच बिनधास्तपणे खेळत असल्याचं पाहून मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. उत्कर्ष शिंदे म्हणतो, “ऐसा डर होना चाहिए, क्या बात है सूरज…तुझा आत्मविश्वास पाहून फार छान वाटलं” तर, अन्य युजर्सनी सुद्धा सूरजने गेम खेळण्यास सुरुवात केलीये हे पाहून आनंद व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi suraj chavan huge fight with arbaz and nikki watch promo sva 00