सध्या आयपीएलचा १७वा मोसम सुरू आहे. काल, १४ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना वानखेडेवर स्टेडियमवर झाला. मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर चेन्नईने २० धावांनी मुंबईचा पराभव केला.

चेन्नईने प्रथम फलंदाजी करून २० षटकांत २०६ धावा केल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सला या मोसमातील पहिल्या विजयासाठी २०७ धावांचं आव्हान होतं. पण मुंबई २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १८६ धावाच करू शकली. आयपीएलच्या १७व्या मोसमातील मुंबई इंडियन्सचा हा चौथा पराभव आहे. मुंबईच्या चौथ्या पराभवनंतर एका मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Video: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची तारीख बदलली, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…

मुंबई इंडियन्सच्या कालच्या पराभवानंतर ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेता सौरभ चौघुलेने इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये सौरभने लिहिलं आहे, “शेवटी त्याच २० धावांनी हरलो…अजून पण सांगतोय नारळ द्या…”

तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये सौरभने लिहिलं आहे, “बॅटला बॉल नाही लागला तर Wide आहे Wide आहे ओरडायचो लहानपणी तसंच काहीस वाटलं, जेव्हा त्यानं Review घेतला.” सौरभच्या या दोन पोस्टनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर अजय देवगणचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा आहे फोटो, पाहा व्हिडीओ

दरम्यान, सौरभच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याची ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत त्याने साकारलेला मल्हार प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. या मालिकेनंतर सौरभ सध्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याने धनंजयची भूमिका साकारली आहे.