‘बिग बॉस’चा १७ वा सीझन आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. आज या शोचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण या पाच स्पर्धकांनी गेले ३ महिने दमदार कामगिरी करत ‘बिग बॉस’च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अखेरच्या दिवशी कोणता स्पर्धक सर्वाधिक मतं मिळवून विजेतेपदावर आपलं नाव कोरणार? हे पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक उत्सुक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्याला रविवारी (२८जानेवारी) सायंकाळी ६ वाजता सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम तब्बल ६ तास रंगणार आहे. यावेळी शोमध्ये सहभागी झालेले सगळे स्पर्धक खास परफॉर्मन्स सादर करणार आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी सलमान खान विजेत्या स्पर्धकाचं नाव घोषित करेल. त्यामुळे सध्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाच स्पर्धकांमध्ये प्रेक्षकांच्या मतांसाठी जोरदार चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडेला मराठी कलाविश्वातील तिच्या अनेक मैत्रिणींनी पाठिंबा दिला आहे. अमृता खानविलकर, अभिज्ञा भावे यांच्या पाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री अंकिताच्या समर्थनात उतरली आहे. यापूर्वी तिने अंकिताबरोबर ‘पवित्रा रिश्ता’मध्ये स्क्रीन शेअर केली होती. ही अभिनेत्री कोण आहे? जाणून घेऊयात…

हेही वाचा : “…तर २ लाथा मारल्या असत्या”, BMC च्या कर्मचाऱ्यांनी जात विचारल्यानंतर पुष्कर जोगची संतप्त पोस्ट; म्हणाला…

अभिनेत्री प्रिया मराठे ही कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अंकिता लोखंडेबरोबर ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत प्रियाने वर्षा हे पात्र साकारलं होतं. अंकिता व तिची गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री असल्याने अभिनेत्रीने नुकतीच अंकितासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय प्रिया अंकिता-विकीच्या लग्नालादेखील उपस्थितीत होती.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेराची यशोगाथा सांगणार ‘बहिर्जी’

“अंकिताला मी अनेक वर्षांपासून ओळखते. तिचा संघर्ष, आजवरचा प्रवास सगळं काही मी जवळून पाहिलंय. ती खऱ्या आयुष्यात देखील फायटर आहे. तुम्ही सुद्धा अंकिताचा बिग बॉसमधील प्रवास खूप जवळून पाहिलाय. तिच्यातील खरेपणामुळे आज तिने हा स्पर्धेचा अंतिम टप्पा गाठला आहे. त्यामुळे आज तिच्या सगळ्या चाहत्यांना मी एक खास विनंती करणार आहे. प्रेक्षकांनो! तुमचं सर्वांचं अंकिताप्रती असलेलं प्रेम मतांच्या स्वरुपात दाखवा. तिला तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज अंकिताला व्होट करा.” असं प्रिया मराठेने हा व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा : “नायिका दिसायला उंच, गोरी अन्…”, ऋतुजा बागवेला लोकप्रिय मालिकेतून केलं होतं रिप्लेस; म्हणाली, “वयाच्या २७ व्या वर्षी…”

दरम्यान, आता अंतिम सामन्यात कोणता स्पर्धक बिग बॉसच्या १७ व्या सीझनच्या ट्रॉफीवर नाव कोरणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pavitra rishta fame marathi actress priya marathe supports ankita lokhande and urge for votes sva 00
First published on: 28-01-2024 at 12:23 IST