मुंबई : ‘यूपीएससी’ परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी राज्य सरकारतर्फे मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर अशा सहा ठिकाणी विनामूल्य प्रशिक्षण केंद्रे चालवली जातात. या केंद्रांमध्ये ५४० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. या केंद्रातील उत्तीर्ण उमेदवार दिल्लीत आयोजित केल्या जाणाऱ्या विनामूल्य अभिरूप मुलाखतीमध्ये (मॉक इंटरव्ह्यू) सहभागी होतात. महाराष्ट्र सदनामध्ये होणाऱ्या अभिरूप मुलाखती घेणाऱ्या समितीमध्ये केंद्रीय प्रशासकीय सेवेतील मराठी अधिकाऱ्यांचा समावेश असतो. दरवर्षी शंभराहून अधिक विद्यार्थी या अभिरूप मुलाखतीचा लाभ घेतात. यंदा दिल्लीतील अभिरूप मुलाखतींसाठी ६१ उमेदवार आले होते आणि त्यापैकी २१ उमेदवारांनी ‘यूपीएससी’च्या नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीतही यश मिळवल्याची माहिती ‘यूपीएससी’ नागपूर प्रशिक्षण केंद्राचे डॉ. प्रमोद कमलाकर लाखे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कश्मिराच्या मूळ गावी जल्लोषाचे वातावरण

बोईसर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) राज्यात पहिल्या आलेल्या डॉ. कश्मिरा संखे हिच्या पालघर तालुक्यातील मूळ गावी जल्लोषाचे वातावरण आहे. गावच्या कन्येने मिळविलेल्या या यशामुळे गावातील सर्वानाच अभिमान आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीलगत कुंभवली ग्रामपंचायत हद्दीतील एकलारे हे कश्मिराचे मूळ गाव. डॉ. किशोर संखे हे सध्या कुटुंबीयांसह ठाण्यात वास्तव्यास आहेत. कश्मिराने मिळविलेल्या यशामुळे एकलारे गावात जल्लोष करण्यात आला. पालघर तालुक्यातील वंजारी समाजातील संखे पहिली आएएस होणार असल्याने समाजात आनंदाचे वातावरण आहे.

यशस्वी विद्यार्थी

कश्मिरा किशोर संखे – ठाणे (२५), जानव्ही मनीष साठे – ठाणे (१२७), ऋषिकेश हनुमंत शिंदे – सांगली (१८३), हरीश मंडलिक – मुंबई (३१०), अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे – ठाणे (३४९), अनिकेत विजयसिंह पाटील – जळगाव (४६२), आशिष अशोक पाटील – कोल्हापूर (४६३), स्वप्निल बागल – हिंगोली (५०४), शुंभागी पोटे – (५३८), सईद मोहम्मद हुसेन – मुंबई (५७०), रोशन केवलसिंह कच्छाव – जळगाव (६२०), करण नरेंद्र मोरे – सातारा (६४८), राहुल रमेश अत्राम – नागपूर (६६३). सुमेध मिलिंद जाधव – यवतमाळ (६८७), अतुल निवृत्तीराव ढाकणे – बीड (७३७), निखिल अनंत कांबळे – पुणे (८१६), निहाल प्रमोद कोरे – सांगली (९२२), ओमकार राजेंद्र गुंडगे – सातारा (प्रोव्हिजनल), राजश्री शांताराम देशमुख – अहमदनगर (प्रोव्हिजनल), प्रतीक नंदकुमार कोरडे – नागपूर (प्रोव्हिजनल), पूजा खेडकर – पुणे (प्रोव्हिजनल).

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 candidates in mock interview success in upsc examination mumbai print news zws