लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: देशात मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’चे (डीएफसी) जाळे विस्तारित केले जात आहे. पनवेल स्थानकात पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी सोमवारपासून २ ऑक्टोबरपर्यंत ब्लाॅक घेण्यात आला आहे. या ब्लाॅकमुळे सीएसएमटी – पनवेलदरम्यानची शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता सोडण्यात आली. त्यानंतर एकही लोकल पनवेलसाठी सोडण्यात आली नाही. मात्र याबाबत अनेक प्रवासी अनभिज्ञ असल्याने त्यांना घरी जाण्यासाठी ऐनवेळी पर्याय शोधावा लागला. अनेक पनवेल लोकल बेलापूरपर्यंतच चालवण्यास सुरुवात झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मालवाहतुकीची स्वतंत्र वाहतूक करण्यासाठी दादरी – जेएनपीटीदरम्यान पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर उभारण्यात येत आहे. या कॉरिडॉरसाठी पनवेल यार्डमध्ये दोन रेल्वे मार्ग बांधण्यात येत आहेत. या मार्गाचे १८ ऑगस्टपासून काम सुरू झाले.
हेही वाचा… गणेश आगमन मिरवणुकांमध्ये मोबाइल चोरणारे अटकेत
अतिरिक्त कामासाठी ११ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत रात्री १२.३० ते पहाटे ५.३० पर्यंत ब्लाॅक घेण्यात आला आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावरून शेवटची पनवेल लोकल रात्री १०.५८ वाजता सोडण्यात आली. तसेच इतर अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. परिणामी, कार्यालयातून रात्री ११ नंतर सुटणाऱ्या प्रवाशांना पनवेलला जाण्यासाठी पर्याय शोधावा लागत आहे.
सीएसएमटी-पनवेल डाऊन मार्ग
सीएसएमटी-पनवेल शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता
सीएसएमटी-पनवेल पहिली लोकल पहाटे ४.३२ वाजता
सीएसएमटी-पनवेल रात्री ११.१४, रात्री १२.२४ ,पहाटे ५.१८,सकाळी ६.४० या लोकल रद्द
सीएसएमटी-पनवेल रात्री ११.३०, रात्री ११.५२, रात्री १२,१३, रात्री १२.४० या लोकल बेलापूरपर्यंत धावतील आणि तेथूनच सीएसएमटीकडे रवाना होतील.
वडाळा-बेलापुर रात्री १२.५० ची लोकल वाशी पर्यत धावणार
पनवेल-सीएसएमटी अप मार्ग
पनवेल-सीएसएमटी रात्री ९.५२,रात्री १०.५८, पहाटे ४.०३, पहाटे ५.३१ या लोकल रद्द
पनवेल स्थानकातून सीएसएमटीकरिता पहिली लोकल पहाटे ५.४० वाजता
ठाणे -पनवेल डाऊन ट्रान्सहार्बर मार्ग
ठाणे-पनवेल शेवटची लोकल रात्री ११.३२ वाजता
ठाणे-पनवेल पहिली लोकल सकाळी ६.२० वाजता
ठाणे-पनवेल-नेरुळ रात्री ९.३६, रात्री १२.०५, पहाटे ५.१२, पहाटे ५,४० या लोकल रद्द
पनवेल – ठाणे अप ट्रान्सहार्बर मार्ग
पनवेल-ठाणे शेवटची लोकल रात्री १०.१५ वाजता
पनवेल-ठाणे पहिली लोकल पहाटे ६.१३ वाजता
पनवेल-ठाणे रात्री ११.१८, पहाटे ४.३३, पहाटे ४.५३ या लोकल रद्द