मुंबई: भायखळ्यातील एका सामान्य कार्यकर्त्याने पंधरा दिवसात दोनदा पक्षप्रवेश करण्याचा विक्रम केला आहे. भायखळा विभागातील पदाधिकारी संतोष कदम आणि प्राची कदम यांनी अवघ्या पंधरा दिवसात शिवसेनेच्या शिंदे गटातून ठाकरे गटात आणि मग परत शिंदे गटात असा पक्ष प्रवेश केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भायखळा विभागातील पदाधिकारी संतोष कदम आणि प्राची कदम यांनी पंधरा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटात रीतसर पक्षप्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. शिंदे गटातील कार्यकर्ता परत स्वगृही परतल्यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी त्यांचे चांगले स्वागत केले.

मात्र ही बाब शिंदे गटाचे भायखळ्यातील विभागप्रमुख यशवंत जाधव यांना कळताच त्यांनी फोन करून कदम यांच्याकडे हा निर्णय घेण्यामागील कारण विचारले. पक्षातील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडल्याचे कदम यांनी सांगितले. जाधव यांनी संबंधित व्यक्तीला समज देऊन संतोष कदम आणि प्राची कदम यांच्या मनातली नाराजी दूर केली. त्यामुळे संतोष कदम हे पुन्हा शिंदे गटात येण्यास तयार झाले.

हेही वाचा… मुंबईत १२ दिवसांत ३ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

आपण तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षात चुकीचा संदेश गेल्याचे लक्षात आल्याने यशवंत जाधव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पक्षात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांचा पुन्हा पक्षप्रवेश करून घेत त्यांना झाले गेले विसरून जात पुन्हा पक्षवाढीसाठी सक्रिय होण्यास सांगितले.

आपण तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षात चुकीचा संदेश गेल्याचे लक्षात आल्याने यशवंत जाधव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असे कदम यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी काल शिवसेना उपनेते तथा विभागप्रमुख यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Byculla division workers santosh kadam and prachi kadam entered from shinde to thackeray group and then back to shinde group of shiv sena in fifteen days mumbai print news dvr