scorecardresearch

Premium

मुंबईत १२ दिवसांत ३ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

या पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ४८ जणांना अटक करण्यात आली आहे.

Gutkha worth 3 lakh seized 12 days Mumbai Action Food and Drug Administration
मुंबईत १२ दिवसांत ३ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई: मुंबईत गुटखा, पान मसाला व सुगंधीत पदार्थांची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मागील काही दिवसांपासून या पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात माेहीम हाती घेतली आहे. त्यानुसार १२ दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील विविध ठिकाणांहून तब्बल ३ लाख ८४ हजार ४०५ रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखू हे पदार्थ जप्त केले, तर या पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ४८ जणांना अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने शहरातील गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरोधात धडक माेहीम हाती घेतली आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या १२ दिवसांत शहरातील विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यानुसार मुंबईतील वांद्रे परिसरातील हिल रोड, बेहरामपाडा, खेरवाडी रोड, ए.के. मार्ग या ठिकाणांवरील १० दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे घाटकोपर पश्चिमेकडील लालबहाद्दूर शास्त्री मार्ग आणि अकबर लाला कम्पाऊंड, साकीनाका येथील पॅकवेल कम्पाऊंड, लालबाग येथील चिवडा गल्ली, नागपाडा येथील अरब गल्ली, कामाठीपुरा, जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा, बोरिवली पश्चिमेकडील चामुंडा सर्कलजवळ, परळ एस. टी आगराजवळ, मुलुंड आणि मालाड या भागात ही कारवाई करण्यात आली.

state bank of india marathi news, bhandup west marathi news, mortgaged gold looted sbi bank marathi news
मुंबई : ग्राहकांचे तीन कोटी रुपये किंमतीचे सोने लुटणारा बँक कर्मचारी अटकेत
mumbai high court marathi news, lalit tekchandani marathi news
तळोजा गृहप्रकल्प प्रकरणात विकासक ललित टेकचंदानींविरोधात गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
mumbai, gokhale bridge, barfiwala flyover
गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडणे अशक्य, मुंबई पालिकेला उलगडा; उत्तर शोधण्यासाठी व्हीजेटीआयची मदत
mumbai marathi news, senior citizen mhada marathi news
ज्येष्ठ नागरिक म्हाडातील विकासकाची नियुक्ती रद्द करु शकतात!

हेही वाचा… मुंबईः महिला पोलिसाला चावणाऱ्या आरोपीला अटक

स्थानिक पाेलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने ३ लाख ८४ हजार ४०५ रुपयांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला. कारवाई केलेल्या या दुकानांतून गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचे ४८ नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तसेच या प्रकरणी ४२ दुकानांना टाळे ठोकून ४८ जणांना अटक केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासानाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gutkha worth 3 lakh seized in 12 days in mumbai action by the food and drug administration mumbai print news dvr

First published on: 08-12-2023 at 13:01 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×