मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. त्याचबरोबर नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे. या रेल्वेगाडीच्या २४ अतिरिक्त फेऱ्या होतील. त्यामुळे मध्य रेल्वेने चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता ३५६ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून हुजूर साहेब नांदेड येथे गाडी धावणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ही गाडी सुरू होणार असून ती जून अखेरीपर्यंत रेल्वेगाडी धावेल. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०११०५ ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ९ एप्रिल ते २०२५ ते २५ जून २०२५ पर्यंत दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२.५५ वाजता सुटेल आणि नांदेड येथे त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०६ ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ९ एप्रिल २०२५ ते २५ जून २०२५ पर्यंत दर बुधवारी नांदेड येथून रात्री ८ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल.

या रेल्वेगाडीला एक प्रथम वातानुकूलित डबा, एक द्वितीय वातानुकूलित डबा, ५ तृतीय वातानुकूलित डबे, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्डस ब्रेक व्हॅन, १ जनरेशन व्हॅन आणि १ पॅन्ट्री असेल. थांबे कोणते? या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा येथे थांबा असेल. गाडीचे आरक्षण विशेष शुल्कासह २५ मार्च रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल. तसेच अनारक्षित डब्यासाठीचे तिकीट अतिजलद मेल, एक्स्प्रेससाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह यूटीएस द्वारे आरक्षित करता येतील.

नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय रेल विकास भवन चैतन्य नगर नांदेड येथे आहे. हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागात आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, बंगळूर, चेन्नई, चंदिगढ, जयपूर, बनारस, अलाहाबाद, विशाखापट्टणम, श्री गंगानगर, ओरिसा, हावडा, तिरुपती, कोल्हापूर, पटना, नागपूर येथून नांदेडसाठी थेट रेल्वेसेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway special trains for nanded from mumbai division mumbai print news css