Central Railway Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकावर चुकीचा सिग्नल मिळाल्याने मालगाडी वेगळ्या रुळावर गेली. परिणामी त्या रुळावर धावणाऱ्या लोकल गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. बदलापूर स्थानकावर लोकल गाड्या उभ्या असून खोपोलीकडे जाणाऱ्या सर्व लोकल अंबरनाथपर्यंत मर्यादित करण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अपरिहार्य काीलरणांमुळे, SE मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. बदलापूर, कर्जत, खोपोलीकडे जाणाऱ्या सर्व डाऊन मार्गावर लोकल अंबरनाथपर्यंत धावतील आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यास सुटतील”, अशी माहिती मध्य रेल्वेकडून (Central Railway) देण्यात आली आहे. दरम्यान, मालगाडी आता रवाना झाली असून सिग्नल यंत्रणेतील दुरुस्तीसाठी सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे (Central Railway) सातत्याने उशिराने धावत आहे. तांत्रिक यंत्रणेत बिघाड किंवा पावसामुळे दृष्यमानता कमी झाल्याने मध्य रेल्वेच्या वेळपत्रकात बिघडतं. त्यातच आता कार्यालय सुटण्याची वेळ असल्याने बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. बदलापूर, कर्जत, खोपोलीपर्यंतचे प्रवासी मुंबईच्या दिशेने नोकरीनिमित्त येत असता.. परंतु, आता ऐन गर्दीच्या वेळीच बदलापूर स्थानकात लोकल अडकून पडल्याने अंबरनाथपर्यंत लोकल फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंबरनाथच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

हेही वाचा >> मुंबई: पावसामुळे १५० हून अधिक लोकल रद्द

पावसामुळे मुंबई लोकल झाली होती विस्कळीत (Central Railway)

मुंबईसह ठाण्यातील अनेक सखल भागात २५ जुलै रोजी पाणी भरले होते. अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. नदी आणि पुलावरून पाणी वाहू लागल्याने, रस्ते मार्ग ठप्प झाले. परिणामी, मध्य रेल्वेवरील (Central Railway) लोकलचे वेळापत्रक कोलमडले. ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मार्ग स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी लोकल फेऱ्यांची वारंवारता मंदावली. सकाळ आणि सायंकाळी, गर्दीच्यावेळी प्रवाशांची समस्या आणखीन वाढली.

 कल्याण, बदलापूर, कर्जत या भागात जास्त पाऊस पडल्याने, तेथील लोकल सेवेवर परिणाम झाला. बदलापूर ते वांगणी या रेल्वे मार्गादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव ताशी ३० किमी रेल्वेची (Central Railway) वेगमर्यादा ठेवली होती. त्यामुळे या मार्गावरील अनेक फेऱ्या रद्द झाल्या. काही अंशत: रद्द झाल्या आणि अनेकांना विलंब झाला. सीएसएमटीकडे येणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल २० ते ४० मिनिटे, हार्बर मार्गावरील सीएसएमटी – बेलापूर, पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन लोकल १० ते १५ मिनिटे, तर पश्चिम रेल्वेवरील लोकल १० ते २० मिनिटे विलंबाने धावल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway update all down mumbai local towards badlapur karjat khopoli will run up to ambernath run back as spl csmt sgk