मुंबई : कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्स्प्रेसला एक शयनयान डबा जोडण्यात आला आहे. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वेगाडीच्या डब्याच्या संरचनेत केलेला बदल तात्पुरत्या कालावधीसाठी असणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १६३३६ / १६३३५ नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्स्प्रेस २२ लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डबे आहेत. या रेल्वेगाडीला द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे दोन डबे, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे सहा डबे, शयनयान सात डबे, सामान्य ४ डबे, पॅन्ट्री कार एक डबा, जनरेटरचा एक डबा, एसएलआर एक डबा अशी रचना आहे. परंतु, १६ डिसेंबरपासून गाडी क्रमांक १६३३६ नागरकोइल – गांधीधाम एक्स्प्रेसच्या आणि १९ डिसेंबरपासून गाडी क्रमांक १६३३५ गांधीधाम – नागरकोइल एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला आहे.
या एक्स्प्रेसच्या द्वितीय वातानुकूलित श्रेणीच्या दोन डब्यापैकी एक डबा वगळण्यात येणार आहे. तर, या डब्याच्या जागी एक शयनयान डबा जोडला जाईल. त्यामुळे एकूण शयनयान डब्याची संख्या आठ होईल. सुधारित संरचनेुसार, या रेल्वेगाडीला द्वितीय वातानुकूलित श्रेणीचा एक डबा, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे ६ डबे, शयनयान ८ डबे, सामान्य डबे ४, पॅन्ट्री कार एक डबा, जनरेटरचा एक डबा, एसएलआर एक डबा असेल.
