मुंबई : सामूहिक बलात्कारासारख्या गंभीर आरोपांच्या खटल्याला होणारा विलंब हा जामीन मिळण्याचा आधार असू शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच, अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. अर्जदार बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याखाली कारागृहात आहे. त्यामुळे, प्रदीर्घ कारावासाच्या कारणास्तव आरोपीला जामीन मंजूर करता येणार नाही, असेही न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने उपरोक्त निर्णय देताना स्पष्ट केले. तथापि, सत्र न्यायालयाने पुढील नऊ महिन्यांत खटल्याची सुनावणी पूर्ण करावी. त्याचप्रमाणे, दर तीन महिन्यांनी खटल्याच्या प्रगतीची अहवाल सादर करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले.

हेही वाचा : रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay is no basis for bail in serious cases observes high court while denying bail to accused in gang rape case mumbai print news css
First published on: 23-04-2024 at 13:22 IST