आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड झालं. या बंडाचं कारण शिवसेनेवर निधीबाबत राष्ट्रवादीकडून करण्यात येत असलेला अन्याय सांगण्यात येत होतो. पण, अर्थसंकल्पात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे गट आणि भाजपाच्या मंत्र्यांच्या खात्याला किती निधी मिळाला याची आकडेवारी वाचून दाखवली होती. याला आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार काय म्हणाले होते?

“अर्थसंकल्पात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना ३४ टक्के निधी देण्यात आला. तर, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी मंत्र्यांना तब्बल ६६ टक्के निधी देण्यात आला. ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. जेवोनिया तृप्त कोण झाला?’,” असं संत तुकाराम महाराजांच्या ओवींचा संदर्भ घेत अजित पवारांनी सरकारचा समाचार घेतला होता.

हेही वाचा : “राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’…”, शीतल म्हात्रे प्रकरणावरून संजय राऊतांची टीका; शिंदे गटाला इशारा देत म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं?

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अर्थसंकल्पात शिवसेनेला ३४ टक्के आणि भाजपाला ६६ टक्के निधी मिळाला आहे. पण, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला २ लाख ४८ हजार ३८८ कोटी रूपये, काँग्रेसला १ लाख २१ हजार १४ कोटी आणि सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला ६६ हजार कोटी रूपयांचा निधी मिळाला. म्हणजे फक्त १५ टक्के.”

“जेव्हा त्यांचं ५६ आमदार होते, तेव्हा १५ टक्के निधी देण्यात आला होता. आता आमच्याबरोबर ४० आमदार आहेत, तरीही ३४ टक्के निधी दिली. त्यामुळे रामदास आठवले यांच्या शब्दांत सांगायचं झाला तर, ‘तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी’,” अशी टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा : आसामचे मुख्यमंत्री आणि नारायण राणेंच्या ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांची भाजपावर टीका; नेमकं काय म्हणाले?

तसेच, “आमच्या अर्थसंकल्पात पंचामृत आहे. तुमच्या काळात करोना होता, तेव्हा कोणतं अमृत चालू होतं. कोणासाठी आपण निर्णय घेत होता,” असा सवालाही देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांकडे रोख धरत विचारला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on ajit pawar over shinde group maharashtra assembly budget ssa