आनंद दिघेंच्या संपत्तीवरून मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | First reaction of MNS Sandeep Deshpande on allegations of CM Eknath Shinde about Anand dighe property on Uddhav Thackeray | Loksatta

आनंद दिघेंच्या संपत्तीवरून मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या संपत्तीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर मनसेची प्रतिक्रिया आली आहे.

आनंद दिघेंच्या संपत्तीवरून मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
संदीप देशपांडे, आनंद दिघे व उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात आनंद दिघे यांच्या संपत्तीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनाही पत्रकारांनी याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (६ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संदीप देशपांडे म्हणाले, “आनंद दिघेंबाबत त्यावेळी काय झालं आणि काय नाही हे मला काहीही माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. जो अनुभव माणसाला स्वतःला येतो त्यावर बोलू शकतो, जो इतरांचा अनुभव आहे त्यावर मी बोलू शकत नाही.”

एकनाथ शिंदेंनी नेमके काय आरोप केले होते?

आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर जेव्हा मी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना भेटलो, तेव्हा त्यांनी विचारपूस करण्याऐवजी आनंद दिघेंची संपत्ती कुठे-कुठे आहे? याबाबत विचारलं, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर मी पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यावेळी उद्धव ठाकरे काय म्हणाले? याबद्दल मी आजपर्यंत कुणालाही बोललो नाही. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा ते दिघेसाहेबांनी ठाण्यात पक्ष कसा वाढवला? संघटना कशी वाढवली? कसे काम करत होते? आता ठाणे जिल्ह्यात आपल्याला काय करावं लागेलं? असं विचारतील असं मला वाटलं. पण त्यांनी मला काय विचारलं? तर आनंद दिघेंची संपत्ती कुठे कुठे आणि किती आहे? कुणाच्या नावावर आहे?”

“आहो, आनंद दिघे यांचं बँकेत खातंही नव्हतं. मी आजही बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, त्यांनी हे विचारल्यानंतर मला धक्काच बसला, मी कधीही खोटं बोलत नाही, खोटं बोलून सहानुभूती मिळवणारा हा एकनाथ शिंदे नाही. ज्या काळात दिघेसाहेबांची लोकप्रियता वाढत होती. त्या काळात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नाही, व्हायचं नाही, असं म्हणत होते, पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळे पक्षात जे-जे कार्यकर्ते मोठे होतात त्यांना कापा, त्यांना आडवे करा, असं काम उद्धव ठाकरेंनी केलं. पण तुम्ही त्यांचे पाय कापत असताना पक्षाचे पायही कापत होता, हे विसरून गेलात,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

“२०१७ मध्ये शिवसेना-मनसे युतीसाठी आम्हाला मातोश्रीवर बोलावलं”

यावेळी संदीप देशपांडेंनी आनंद दिघेंच्या प्रकरणावर बोलणं टाळलं असलं तरी स्वतःचा अनुभव सांगत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “२०१७ मध्ये मी आणि स्वतः संतोष दुरी आम्हाला मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं. आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे असं सांगण्यात आलं.”

हेही वाचा : Photos : आनंद दिघेंची संपत्ती कुणाच्या नावावर ते बापाला विकण्याचा आरोप, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील २० महत्त्वाचे मुद्दे, वाचा…

“युतीबाबत स्वतः उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”

“त्यावेळी आमच्याशी बोलणी केली आणि आम्हाला हेही सांगण्यात आलं की, आम्ही भारतीय जनता पार्टीशी लग्न मोडतो आणि त्यानंतर आपण नवीन लग्न करू. मात्र, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. त्यामुळे बाकी मला काही माहिती नाही, मात्र खंजीर खुपसण्याची यांची सवय जुनी आहे एवढं नक्की,” असा आरोप संदीप देशपांडेंनी केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई : रेल्वे स्थानकांमध्ये फेरीवाल्यांचा वावर कायम ; कारवाई केल्यानंतरही परिस्थिती जैसे थे

संबंधित बातम्या

VIDEO: “संजय राऊतांच्या तोंडात त्यांच्या आईने…”, आमदार गायकवाडांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
“मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास…”, गुलाबराव पाटील संतप्त
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘समृद्धी महामार्गावरून’ एकत्र प्रवास केलेली गाडी कोणाची? काँग्रेसचा खळबळजनक आरोप; म्हणाले…
महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी वाढली! कर्नाटकनंतर आता नाशिकमधील गावं गुजरातमध्ये विलीन करण्याची मागणी
‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती