मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास अधिक थंडगार करण्यासाठी वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ६ नोव्हेंबरपासून सामान्य लोकलच्या जागी १० नवीन वातानुकूलित लोकल सेवा धावणार आहेत. १० फेऱ्यांपैकी गर्दीच्या वेळी दोन फेऱ्या धावतील.

वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरांमध्ये कपात झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर सध्या धावणाऱ्या वातानुकूलित लोकलमध्ये गर्दी होऊ लागली होती. त्यामुळे मध्य रेल्वेने आणखीन १० लोकल फेऱ्या वाढवून एकूण ६६ लोकल फेऱ्या दररोज धावतील. वातानुकूलित लोकल सोमवार ते शनिवापर्यंत धावतील. तर रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वातानुकूलित लोकल धावणार नाहीत.

हेही वाचा >>>आशा सेविकांचे १ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन

वातानुकूलित गाडय़ा

  • ’ सकाळी ७.१६ वाजता कल्याण ते सीएसएमटी
  • ’ सकाळी १०.२५ वाजता कल्याण ते सीएसएमटी
  • ’ दुपारी २ वाजता अंबरनाथ ते सीएसएमटी
  • ’ सायंकाळी ५.३२ वाजता डोंबिवली ते सीएसएमटी
  • ’ रात्री ८.१० : कल्याण ते परळ
  • ’ सकाळी ८.४९ : सीएसएमटी ते कल्याण
  • ’ सकाळी ११.५८ वाजता सीएसएमटी ते अंबरनाथ
  • ’ सायंकाळी ४.०१ वाजता सीएसएमटी ते डोंबिवली
  • ’ सायंकाळी ६.४० : परळ ते कल्याण
  • ’ रात्री ९.३९ वाजता परळ ते कल्याण